मृ.श.१८१९ (२८ ८ १८९७). याांचें पूर्ण...

13
1 वामन आबाजी (८) ज. गह , (दापोली) ज.श.१७५८ भा.शु.१२ (२१-९-१८३६) मृ.श.१८१९ (२८-८-१८९७). याच पूण मराठी श आडे आण है येथ झायावर काही काळ दापोलीया मुनसफ कोीत उमेदवारी करन नतर येथील शमशनरी शाळत सवा वण इजी शशकले. या वेळी वयाया १७ या वी याया मनाववरद हयाचा ववाह झाला. पुढ मुबईत शशकवया पकरन ल फन इणयूय ववायास कर लागले. कै . महादेव गोववद रानडे, खडेराव बेदरकर, वनायकराव कीतणने, रामभाऊ उदास, कृजीपत बाळ इयाफद मडळी याची सहायायी होती. स. १८५८ मय १० रपयाची युशनअर कालरशशप शमळवून हे फन कॉलेजात गेले. पुढील वी २५ रपयाची युशनअर कालरशशप शमळू लागयावर याना शशकवया सोडून शनवेधप आपला अयास कररता येऊ लागला. याच वी मुबई वालय थापन झाल. आण हे मॅफियुलेशनची परीा उीण झाले. सन १८६० मय फ..ची आण १८६२ साली ववालयाची पफहली बी..ची परीा झाली, तीतून बी.. उीण झाले. याचेच बरोबर डॉर सर रामकृ गोपाळ भाडारकर, रावबहादुर महादेव गोवद रानडे, बाळ मगेश वागळे, हेफह उीण झाले. लागलीच याना पूना कॉलेजात शतमासी पनास रपयावर दणा फे लो नेमयात आल. या दोन वात यानी बाळशाी देव-ोके कर आण गगाधरशाी दातार याया जवळ युपणत, साफहय, यायशा आण शारीरभाय याचा जुया पदतीन अयास के ला. सकृत भाेया इतया दुढ अयासानतरफह मराठी भाेवरील याची भणत यणक शचतफह कमी झाली नाही. दुसरी भाा मराठी घेऊन हे बी.. झाले. या अडीच वाणया पुयाया वातयात याचा आण ववु परशुरामशाी पफडताचा दुढ परचय झाला आण याच फहदू ची सामाणजक सुधारा हो अयत अवय आहे अस मत झाल. वधवा-पुनवणवाह पातील अयत अशभमानी लोकातील हे अगय असत. सन १८६४ मय याना ववामबाग हायकु लात १५० रपयावर पफहले अशसण मातर हून नेशमल आपुढ लवकरच हे म .. ची परीा उीण झाले. सन १८६७ मय याना हैदराबाद (शसध) हायकू लचे मुय अयापक नेशमल. आण पुढ सन १८६९ मय राशगरी हायकु लचे हे मुय अयापक झाले. शसधमय याचा फारज लौफकक झाला. शसधी भाेच उम ान यानी सपादन के ल. सन १८७० मय मुबईया ल फन हायकू लचे हे पफहले फहदी हाइस वणसपाल झाले. सन १८७४ मय राशगरीस गेले. १८७९ मय परत पुयास ववामबाग हायकू लचे मुय अयापक हून आले आण १८८२ त मुबईस लफफन हायकू लचे कायम वसपॉल झाले. फहदी मनुयाची या ेस जागेवर ही पफहलीच नेमूक होय. यावेळअँलो इफडयन वृपात फार गवगवा झाला, आण यानी या नेमुकीववयी अयत नापसशत दशणववली. सन १८९६ चे ारभास वलायत सरकारन याना सी. आय . इण. ही बह मानाची पदवी फदयावर या वेळचे डायरेर फ पणलक इिशन, मे. चाचीड यानी वामनरावाना ज अशभनदनपर प शलफहल यामय वरील ीकेला चोख उर फदलेल आहे. त प अस-

Upload: others

Post on 26-Feb-2020

14 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

  • 1

    वामन आबाजी (८) ज. गव्हें , (दापोली) ज.श.१७५८ भा.शु.१२ (२१-९-१८३६) म.ृश.१८१९ (२८-८-१८९७). याांचें पूर्ण मराठी शशक्षर् आडे आणर् हर्ै येथें झाल्यावर काांही काळ दापोलीच्या मुनसफ कोर्टीत उमेदवारी करुन नांतर येथील शमशनरी शाळेंत सवा वर्ण इांग्रजी शशकले. त्या वेळीां वयाच्या १७ व्या वर्ी याांच्या मनाववरुध्द हयाांचा वववाह झाला. पुढें मुांबईत शशकवण्या पत्करुन ्ल फफन्स्र्टन इणन्स्र्टयूर्टध्यें ववद्याभ्यास करु लागले. कै. महादेव गोववद रानडे, खांडेराव बेदरकर, ववनायकराव कीतणने, रामभाऊ उदास, कृष्र्जीपांत बाळ इत्याफद मांडळी याांची सहाध्यायी होती. स. १८५८ मध्यें १० रुपयाांची ज्युशनअर ्कालरशशप शमळवून हे ्ल फफन्स्र्टन कॉलेजाांत गेले. पुढील वर्ी २५ रुपयाांची ज्युशनअर ्कालरशशप शमळूां लागल्यावर याांना शशकवण्या सोडून शनवधेपर्ें आपला अभ्यास कररताां येऊां लागला. त्याच वर्ी मुांबई ववश्वववद्यालय ्थापन झालें. आणर् हे मॅफिक् युलेशनची परीक्षा उतीरीर्ण झाले. सन १८६० मध्यें ्फ .्.ची आणर् १८६२ साली ववश्वववद्यालयाची पफहली बी.्.ची परीक्षा झाली, तीांतून बी.्. उतीरीर्ण झाले. याांचेच बरोबर डॉक् र्टर सर रामकृष्र् गोपाळ भाांडारकर, रावबहादरु महादेव गोववांद रानडे, बाळ मांगेश वागळे, हेफह उतीरीर्ण झाले. लागलीच याांना पूना कॉलेजाांत प्रशतमासीां पन्सनास रुपयाांवर दणक्षर्ा फेलो नेमण्याांत आलें. या दोन वर्ाांत याांनीां बाळशास्त्री देव-र्टोकेकर आणर् गांगाधरशास्त्री दातार याांच्या जवळ व्युत्पणतत, साफहत्य, न्सयायशास्त्र आणर् शारीरभाष्य याांचा जुन्सया पध्दतीनें अभ्यास केला. सां्कृत भारे्च्या इतक् या दढु अभ्यासानांतरफह मराठी भारे्वरील याांची भणक् त यणत्कां शचत फह कमी झाली नाही. दसुरी भार्ा मराठी घेऊन हे बी.्. झाले. या अडीच वर्ाणच्या पुण्याच्या वा्तव्याांत याांचा आणर् ववष्रु् परशुरामशास्त्री पांफडताांचा दढु पररचय झाला आणर् याांचें फहांदूांची सामाणजक सुधारर्ा होर्ें अत्यांत अवश्य आहे असें मत झालें. ववधवा-पुनववणवाह पक्षाांतील अत्यांत अशभमानी लोकाांतील हे अग्रगण्य असत. सन १८६४ मध्यें याांना ववश्रामबाग हाय्कुलाांत १५० रुपयाांवर पफहले अशस्र्टणर्ट मा्तर म्हर्ून नेशमलें आणर् पुढें लवकरच हे ्म .्. ची परीक्षा उतीरीर्ण झाले. सन १८६७ मध्यें याांना हैदराबाद (शसांध) हाय्कूलचे मुख्य अध्यापक नेशमलें. आणर् पुढें सन १८६९ मध्यें रत्नाशगरी हाय्कुलचे हे मुख्य अध्यापक झाले. शसांधमध्यें याांचा फारज लौफकक झाला. शसांधी भारे्चें उतीरम ज्ञान याांनी सांपादन केलें. सन १८७० मध्यें मुांबईच्या ्ल फफन्स्र्टन हाय्कूलचे हे पफहले फहांदी व्हाइस वप्रणन्ससपाल झाले. सन १८७४ मध्यें रत्नाशगरीस गेले. १८७९ मध्यें परत पुण्यास ववश्रामबाग हाय्कूलचे मुख्य अध्यापक म्हर्ून आले आणर् १८८२ त मुांबईस ्ल फफन्स्र्टन हाय्कूलचे कायम वप्रन्ससपॉल झाले. फहांदी मनुष्याची त्या श्रषे्ठ जागेवर ही पफहलीच नेमर्ूक होय. त्यावेळीां अगँ्लो इांफडयन वतृीरपत्ाांत फार गवगवा झाला, आणर् त्याांनीां या नेमर्ुकीववर्यीां अत्यांत नापसांशत दशणववली. सन १८९६ चे प्रारांभास ववलायत सरकारनें याांना सी. आय . इण. ही बहुमानाची पदवी फदल्यावर त्या वेळचे डायरेक् र्टर फफ पणलिलक इन्स्िक् शन, मे. चार्टचील्ड याांनी वामनरावाांना जें अशभनांदनपर पत् शलफहलें त्यामध्यें वरील र्टीकेला चोख उतीरर फदलेलें आहे. तें पत् असें-

  • 2

    Poona, January 2, 1896 My dear Mr. Modak, I was very pleased to see the Gazette and I offer you my best wishes and congratulations. You proved to government that with a wealth of talent in the country, it was wholly unnecessary to go outside so often; and your example through a long and distinguished service has had the best influence on the Department and public generally. Yours very sincerely (sd.) K.M. Chatfield

    (मला गॅझेर्ट पाहून फार आनांद झाला. आणर् त्याबद दल मी तुमचें सफदच्छा पूवणक अशभनांदन कररतो. (फहांदु् थान) देशाांतच इतकें बुणध्दवैभव आणर् बुणध्दधन प्राप्त असताां परदेशाांतून इतकें वरचेवर मनुष्यें आर्ववण्याची अगदीां आवश्यकता नाहीां, हें तुम्हीां सरकारास शसध्द करुन फदलें. तुमच्या प्रदीघण आणर् श्रषे्ठ नोकरीांत (केलेल्या कामामुळें) जनतेवर आणर् (ववद्या) खात्यावर फारच चाांगला पररर्ाम झाला आहे.)

    वामनराव ्ल फफन्स्र्टन हाय्कूलचे प्रमुख असताना याांचे सांबांधानें त्या वेळचे इलाखाशधपशत सर जेम्स फग्युणसन आणर् लॉडण रे याांनी याांची पुष्कळ ्तुशत करुन याांच्या कतणबगारीची प्रशांसा केली. मुांबई आणर् पुर्ें येथील सरकारी हाय्कुलें हीां नमुनेदार (सवण सुधारर्ाांनी आणर् सामग्रीनीां पूर्ण) असावयाचीां असा सरकारचा हेतु आहे. त्सास अनुसरुन त्याजवरील हे मुख्याध्यापकफह सवण इलाख्याांत नमुनेदार आहेत असे त्यावेळचे त्याांचे उद्गार आहेत. सन १८९३ मध्यें हे सेवाशनवतृीर झाले. त्यावेळीां सरकारनें याांच्या नोकरीचा पसांतफदशणक ठराव करुन तो सरकारी गॅझेर्टमध्यें प्रशसध्द केला. वामनरावजीांना सन १८७२ मध्यें मुांबई ववश्वववद्याल्याचें सद्य नेशमलें. १८८४ ते १८९२ पयांत हे शसांडीक होते. १८८३ मध्यें याांना जे.पी. (जण्र्टस फफ फद पीस ) नेशमले.

    मराठी भारे्ववर्यीांचा याांचा अशभमान प्रशसध्द आहे. सन १८८४-१८९० पयांत याांनी ववश्वववद्याल्याांत मराठीला योग्य ्थान शमळावें म्हर्ून शसनेर्टमध्यें आणर् बाहेरफह अतोनात खर्टपर्ट केली. परांतु इतराांच्या मनःपूवणक साहयाच्या अभावामुळें त्याांत याांना यश शमळालें नाहीां. परांतु पुढें याांचे परम्नेही न्सयायमूशतण रानडे याांच्या प्रयत्नानें फकशचांत यशप्राशप्त झाली आणर् ्म .्. च्या परीके्षस मराठी घेऊन बसण्याची आज्ञा झाली. याांचा जुन्सया कवीांच्या कृतीांचा दीघण व्यासांग अववरत चालू असे. ज्ञानेश्वर श्रीधर आणर् मुक् तेश्वर हे याांचे आवडते कवव असत. हे ्वांतः मराठीांत काव्य करीत आणर् त्याांत जुन्सया कवीांचे गुर् फदसून येतात. याांनी रशचलेली मधरु पदें प्राथणनासांगीताांत जागोजाग ववखरुलेलीां आहेत. याांनी रशचलेलें जन्समभूमीचें गीत खालीां फदलें आहे.

    (हें गीत वामनरावाांनी प्रशसध्द पांफडता रमाबाई याांच्या ववनांतीवरुन शारदासनदन ्थापनेच्या समारांभाच्या वेळेस म्हर्ण्याकररताां स. १८८८ मध्यें रशचलें.)

    जन्समभमीचें गीत अहा मम देश भूमी । वप्रय वपतजृन्समभूमी । तुझें गीत गाईन मी । आवडीनें माते ।।१।।

  • 3

    नभ ्पषृ्ट शगररकूर्टें । रम्य महा नदी-तर्टें । आम्हाां तव शोभा वारे्ट । अनुपम माते ।।२।। तव वनें उपवनें । सदा सुगांधी सुमनें । सु्वररत पक्षी गानें । उल्हासती माते ।।३।। मधरु सां्कृत वार्ी । काव्य रत्नें कववगर्ीां । मांफडत पाहुनी मनीां । तोर् होय माते ।।४।। ॠवर् ज्ञान ववलशसत । धमणवकृ्ष कुसुशमत । नाना फदव्य फलयुक् त । शोभताशत माते ।।५।। सुलभा, गागीां, मैते्यी । भैमी, साववत्ी, वैदेही । धन्सया तारा शमराबाई । कन्सया तव माते ।।६।। धीरोदार महाशूर । तव पुत् धरुांधर । राम, भीष्म, पाथण वीर । वीरसू तूां माते ।।७।। कालचक्रें तयाांप्रती । लागे भोगर्ें ववपवतीर । तैशीच ही तव ण्थशत । काफहां काल माते ।।८।। तुझया ऐश्वयाणची कीशतण । ऐकूशन जे वाखाणर्ती । तेच आज कठोरोवि । बोलती तुज माते ।।९।। भाग्यसूयण मावळला । येईलशच उदयाला । ऐसा शनश्वय शचतीराला । धीर देतो माते ।।१०।। आम्ही तुझीां बाळें सवण । हरुां तव शत्गुवण । ऐसें येउ महा पवण । प्राथूण देवा माते ।।११।। तुझ्या सेवेलागीां जार् । अपूणशनया धन प्रार् । शसध्द असो थोर सान । सकलफह माते ।।१२।। वामनरावाांनी प्राचीन आणर् अवाणचीन साधसुांताची आख्यानें शलहून मुांबईच्या

    प्राथणनासमाजात त्यावर कीतणने केली. त्याांतील काही खालीां फदलीां आहेत. ्कनाथचररत्, गोपीचांद आख्यान, प्रल्हादचररत्, ध्रवुाख्यान, राकाांबक, दामाजीपांत, याज्ञवल्क्य–मैत्ीयी सांवाद, द्रौपदी-धमणसांवाद, गौतमबुध्द, साके्रफर्टस, येशू णि्त इत्याफद. याांनी प्राथणनासमाजाच्या व्यासपीठावरुन केलेले अनेक उपदेश याच्या मराठी भारे्वरील असामान्सय प्रभुत्वाचे आणर् श्रषे्ठ प्रतीच्या वक् ततृ्वाचे शनदशणक आहेत. मराठी लघुशलपी त्यावेळी अवगत नसल्यामुळें आज ते उपदेश उपललिध नाहीांत. परुां तु त्या वेळच्या श्रोत्याांवर त्याांचा झालेला पररर्ाम खालील अवतरर्ाांवरुन फदसून येतो. कनणल कान्सहोबा रर्छोडदास कीशतणकर, आय . ्म . ्स. याांनी गरे्श जनादणन आगाशे याांना पाठववलेल्या पत्ाांतील काही भाग – Wamanrao soon became one of our most eminent preachers. His extreme piety, his pure and deep devotion, the simplicity of his manner and his earnestness, his eloquent sermons, and his heart-stirring prayers made such a strong impression on my youthful mind, that I

  • 4

    used to look upon him as an ideal teacher of religious truths, beyond compare, and without a rival. That impression is still on my mind. It will be there to my dying day. At times we widely differed, much to my sadness, in matter of social and Hindu domestic reform but my regard and respect for classical scholarship and his eloquence as a preacher have never left me. His silvery voice, manly and musical still rings in my years, although that voice has been mute for over fifteen years.

    ( पुढें लवकरच वामनराव हे ्क आमच्या उतीरम धमोपदेशकाांतील ्क श्रषे्ठ उपदेशक झाले. त्याांची गाढ धमणश्रध्दा, खोल शन ववशुध्द भवि, साधी वागर्ूक, कायोत्सुकता, वक् ततृ्वपूर्ण उपासना आणर् हदयाला जाऊन शमडर्ारी प्राथणना याांचा माझ्या तरुर् मनावर इतका दृढ पररर्ाम झाला कीां, (वामनराव) हे धमणततवें फकतीरा घेण्यासारखीां शकववर्ारे शशक्षक आहेत असें मला वारू्टां लागलें. याांच्या गुर्ाांचा अतुलनीय आणर् बरोबरी करण्यास अशक् य असा पगडा माझ्या मनावर आताफह राफहला आहे आणर् माझ्या अांतापयांत तो फर्टकर्ार केव्हा केव्हा फहांद ुसमाजाच्या अांतगणत आणर् सामाणजक सुधारर्ाांसांबांधानें आमचा तीव्र मतभेद होई. परांतु याांच्या गाढ ववद्वतेीरमुळें आणर् धमोपदेशप्रसांगीांच्या वक् ततृ्वामुळें याांच्या ववर्यीां वार्टर्ारा अशभमान आणर् पूज्यबुणध्द माझ्या मनाांतून अरु्मात्फह कमी झालेली नाहीांत. आज १५ वर्ाणपूवी याांचा शाांत झालेला गांभीर आणर् कर्णमधुर ध्वशन अद्यावपफह माझ्या कानाांत घुमत आहे.)

    वामनराव, जनादणन बाळाजी मोडक (२३/८) आणर् नरशसांहशास्त्री घारे्ट याांनीां शमळून महाभारत, आणर् बरीांच उपशनर्दें हे ग्रांथ शनरशनराळया प्रतीांवरुन वाचनू त्याांतील ववर्याांची आणर् नावाांची सूची केली होती. याांचा गीता आणर् उपशनर्दें याांवरील व्यासांग गाढ होता. याांनी केलेलें उपशनर्दाांचे भार्ान्सतर आणर् त्यावरील र्टीका हीां अप्रकाशशत राफहलीां असून तें ह्तशलणखतफह आज उपललिध नाही. परांतु 'गीताथण सार' हा याांचा शनबांध ववववधज्ञानवव्ताराांत प्रशसध्द झाला होता. तो शनबांध, 'फहांद ुलोकाांत ऐक् याची वणृध्द होण्यास हरकती आणर् त्या दरू होण्याचे उपाय, 'युरोपच्या इशतहासापासुन आपल्या लोकाांनी काय शशकावें' 'बालवववाहासांबांधानें फहताफहत ववचार.' मुांबईच्या हेमांत व्याख्यानमालेंत याांनीां फदलेलीां हीां तीन व्याख्यानें शन याांचे इतर धमणपर शन नीशतपर लेख, याांच्या मेहुर्ीचे पुत् कै. रामचांद्र शभकाजी जोशी याांनी मोठया पररश्रमानें ्कत् करुन सन १९०८ साली मुफद्रत केले. याव्यशतररक् त याांची बरीांच आख्यानें आणर् व्याख्यानें अप्रशसध्द आहेत. गरे्श जनादणन आगाशे यानी ववववधज्ञानवव्ताराांत शलफहल्याप्रमार्ें वामनरावानीां 'उतीररनैर्धचररत' हें नार्टक शलहून आपल्या मराठी भार्ापरु्टत्वाचें प्रमार् प्राप्त केलें आणर् मराठी वाड .मयाच्या ्का प्रधान अांगाांत उतीरम भर घातली. कनणल कीशतणकर याांनी वामनरावाांववर्यीां आपर्ाांस वार्टत असलेला आदर आणर् पे्रम व्यक् त करण्याकररताां वामनराव याांच्या मतृ्यूनांतर १५ वर्ाणनी ्वतःच्या द्रव्यानें हें नार्टक मुफद्रत केले.

    वामनरावाांचें धाशमणक आणर् सामाणजक कायण- हे ्केश्वरी मताचे असून प्राथणना. समाजाच्या सां्थापकापैकी ्क आणर् शेवर्टपयांत त्याांचे आधार्तांभ होते. याांच्या मतृ्यूनांतर

  • 5

    डॉक् र्टर सर रामकृष्र् गोपाळ भाांडारकर याांनी २९ फग्र्ट सन १८९७ रोजीां प्राथणनासमाजाांत पुढील उद्वार काढले, ''ज्याांच्या प्रयत्नानें आजवर हा समाज चालू आहे, अशा समाजबांधूांपैकीां आमचे ्क श्रषे्ठ शमत् काल शनवतणले. समाजासांबांधीांचा त्याांचा उद्योग अववरत होता. याांना धमाणसांबांधीां मोठी आ्था होती. मनुष्याच्या अांतरात्म्यास जागतृ करुन त्याच्यावर उतीरम धमणसां्कार उत्पन्सन करुन त्याला परमेश्वराप्रत पोंचवावें ्तदथण वामनराव शनरांतर झर्टत. कीतणन आणर् उपासना अत्यांत पे्रमळपर्ानें, कळकळीनें आणर् शुध्दभावानें करीत.''

    कै. ववष्र्ु परशुरामशास्त्री पांफडत याांच्याशीां ्नेह जमल्यावर वामनरावाांची सामाणजक सुधाररे्ववर्यीांची मतें पररपक् क होऊां लागलीां. आणर् ववधवाांचा पुनववणवाह होर्ें नीतीच्या आणर् दयेच्या दृष्टीनें अत्यांत अवश्य आहे असें याांचे शनणश्वत मत झालें. आणर् हें मत त्याांनी रत्नाशगरीस सन १८६९ साली व्याख्यानद्वाराां रत्नाशगरीच्या सनातनी लोकाांपुढें शनमीांडपर्ें माांफडल्यामुळें येथील ब्रम्हावृांदाकडून याांना पुष्कळ त्ास झाला.

    णस्त्रयाांचा सामाणजक दजाण वाढावा आणर् त्याांना योग्य शशक्षर् देऊन त्याांना देशाची उन्सनशत करण्याच्या कामीां भाग घेण्यासाठीां शसध्द करण्याांत देशाचें अत्यांत फहत आहे असें याांना नेहमीां वारे्ट.

    ्वतः अत्यांत गररबीांतून यानीां आपला मागण काढल्यामुळें, गरीब ववद्यार्थ्योच्या सवण अडचर्ीांची याांना पूर्ण जार्ीव असल्यामुळे, याांनी आशथणक सुण्थशत आल्यावर गरीब अशा अनेक ववद्यार्थ्योना सवण त-हेचें साहय देऊन याांनी पुढें आणर्लें. अनेक सां्थाांना याांनीां मोठया आनांदानें पुष्कळ देर्ग्या फदल्या. न्सयायमूशतण महादेव गोववांद रानडे याांनी वामनरावाांच्या मतृ्यूनांतर सुबोधपवत्कें त याांच्या सवण चररत्ाचें सार प्रशसध्द केलें आहे, तें वाशचलें असता वामनरावाांच्या ्वभावाचें यथातर्थ्य ज्ञान होते.

    From the pen of the Hin’ble Mr. Justice M.G. Ranade Subodh Patrika

    Sunday the 5th September 1897 The late Mr. Vaman Abaji Modak C.I.E.

    Saint Tukaram has in one of his immortal songs sung how death had no pain for him as he had even when living in the flesh, witnessed his death and the dissolution of death had come and gone leaving him immortal, the flood of life passed over him and disappeared leaving him firm-rooted in the living source of life. To none among us in this generation can these noble words be applied with greater effect than to the soul of our lamented friend Mr. Vaman Rao Modak, whose death we announced in our last issue. For the last four years it may be truly observed of him that his spirit was gradually extricating itself from its earthly tabernacle and witnessing with saintly resignation the gradual dissolution of the flesh without concern, inspired by the angelic hope that he was returning to the fold of his great Master. Death has been very busy during the past year and its cruel hand has been laid upon many, whose work in life had just begun and who gave promise of bearing up the standard of God’s faith and fighting under it against all manner of evil. All those workers, young and old derived their sweetest and holiest inspiration from the great soldier who was struck with the paralytic stroke just four years ago while all the energies of his heart and

  • 6

    head were engaged in the service of God. Like the famous warrior of the Mahabharat he lay on his bed-his body pierced through with the mortal stroke, but not a murmur, not a cry escaped from his lips; while his spirit calm and resigned held communion with the Universal spirit, consoling those who came to condole with him with precious words of wisdom, acquired during the discipline of sixty years in God’s work. We all wished that he might have been spared longer to serve as a bacon of hope and light for a few more years, but that was not to be and we have little reason to complain that it pleased God to take him away from among us. He lived long enough to accomplish his life’s work and that is all that we can reasonably expect in this world. His memory will be the most cherished possession of the hundreds and thousands who sat at his feet during his thirty years of service as a teacher and to those who like the writer of this notice, had the privilege of being closely associated with him for forty years in all his hopes and aspirations, his presence in the heart of hearts will be a reality which no time can ever efface. One had only to see him even casually to find how changed he was in mind and heart, when brought under the influence of Waman Rao’s noble companionship. Awe and reverence was the first feeling inspired in the minds of those who came in contact with him. When you conversed with him, his simple living and high thinking acted like a magnet and touched the most hardened soul and when to this was added the charm of his sweet voice and his sweeter modulation of the richest beauties of the Marathi tongue, you felt as if you were in another world and forgot your cares and your anxieties, your little ambitions and petty disappointments. His command over the English language was great but that was not his chief strength. He has no rival when he spoke in his own sweet mother-tongue. The music of his voice attuned to the highest harmony penetrated into the hearer’s inmost recesses and all passion and excitement was calmed down by its overpowering influence. The speech is an index to the thought and the thought is but a poor figment where it does not spring from a temperament seasoned by habits of self-control. Those who knew him intimately were aware that in his case moderation, charity, the love of humanity, the awe and reverence which religion inspires, devotion to truth – all these were endowments of his nature born with him and they were perfected by habitual self-restraint in a way to blend them all into a harmonious whole. There are those who think that color and character, or as some put it, strong individualism are wanting in our present generation of leaders; those who say this have, it may be said, little knowledge of some of our best men. If ever there was a man who had individualism of a distinct type and a color and character of his own, that man was our departed friend whose loss we mourn today. But his individualism never brought him to tread on other people’s toes. Dissatisfied he was, but his dissatisfaction was with himself. For others, he was sweetness itself and charity personified. In the remarriage troubles of 30 years ago he was singlehanded fighting in the good cause in the very centre of Brahman orthodoxy. Pestered and troubled on all sides with petty annoyances he stood up manfully for the good cause but never an angry word escaped his lips and he never cherished any but the tender feelings for those who were giving him endless trouble. That is the individualism that our saints and prophets in this land have reproduced in their characters and in his own way and with the necessary alterations suitable to our times Mr. Modak followed in their footsteps.

  • 7

    In his struggle for social and religious reform, he never faltered in his allegiance to truth. At the same time nobody could find any vulnerable point in his acts and words and all admitted when the struggle was over, that he was a martyr, not of the militant but of the suffering type. His loss will be felt in many departments of our collective activities, but in none shall we miss him more than in the religious sphere to which indeed, he had devoted the best years of his life and which chiefly engaged his thought, when he retired from the public service. With the externals of creeds and the angularities of practice he had but little sympathy, but his spirit was permeated through and through with the essence of what constitutes true religion in a way that distinguished him as a man marked out for this special work. Devotional by nature, his feelings found expressions in some of our best devotional songs. The Divine presence with him was not a formula but a reality which he felt and cherished as his richest treasure. He had travelled with advantage to his spiritual culture. In perfect sympathy with the Brahmo Samaj movement as it was developed by the late Keshub Chandra Sen, he still regretted the misunderstandings and exaggeration which surrounded that noble man towards the end of his career and though he never subscribed fully to its later development, he was one of those few, on this side of India, who did not on that account cherish any but the feelings of deepest love for the great Brahmo-leader. If Mr. Vaman Rao had been spared in health and vigour after his retirement from service, he would have occupied on this side of India, the same exalted position which Maharshi Devendra Nath Tagor occupies in Bengal and indeed in every part of India wherever his name is known. By temper and habit he was naturally more allied to Maharshi than to any of the other Bengal leaders of religious thought. A good Sanskrit scholar and a translator of some of the Upnishadas, his love of Sanskrit never led him to disparage the claims of the vernacular languages. In this history of our University he will be chiefly known for his great efforts in securing a place for those vernacular studies of the literature of which he was so thorough a master. These attempts failed, as similar attempts made since have also failed, but failure is only a stepping stone to ultimate success. To the outside world Vaman Rao will be chiefly known as a great teacher. He was a great disciplinarian but his discipline was not of fear but of love. His success in this work was so great as to meet with recognition from the highest authorities when they placed him in charge of the greatest Public school in this Presidency- the first native (Indian) graduate who was trusted with this important duty. During his ten years administration of that School he kept up or rather enhanced its high reputation in a way to evoke general admiration. The voluntary tribute of administration paid to him by his numerous students all over the Presidency will be the best indication of the choice that was made by the authorities. We have seen it stated somewhere that Mr. Modak had not sympathy with the efforts made for the political advancement of the country if anybody has a right to speak on this matter, the writer of this notice may claim to do so with some confidence and he feels no hesitation in stating now that Mr. Modak has gone away, his belief that they do him great injustice, who think that he was all for social and religious reform and cared little for politics. He was

  • 8

    one of the keenest political thinkers in our midst. Only his politics were not of the superficial character which, with some people is mistaken for patriotism. As in all other matters the idea of growth not spasmodic but graduated growth regulated and controlled by the necessity that it must be the result of habits acquired by long continued discipline was one to which he subscribed and no temptations swerved him from that ideal. Such in brief is the outline of the character of our departed friend whose loss in these days we have reason to lament as in some sense irreparable. Throughout his life he was able to bear up against all toils and sorrows by the sweet association of his home endeared to him by the companionship of a wife who was a worthy partner in all his joys and sorrows. They, who think our Indian homes are wanting in the sweet associations of devotion and love need only inform themselves how nobly Mrs. Modak served her husband during his four years protracted illness. Indian women have reason to be proud that they possess such martyrs to duty. Mrs. Modak every day of her life during the last four years had the presentiment of what was in store for her and yet she never allowed her sorrow to interfere her duty in attending upon him day and night in his rides and his walks, in ministering his food to him and wakefully keeping up herself to see that every little want of his was timely anticipated and duty looked after. Before him she never had a mournful countenance but cheered him up as through there was no sorrow in her own heart weighing her down with anxiety and care. And the children, little angels about her were like their mother ever solicitous to keep down their own grief and bear company with the sufferer with a patience that is simply indescribable. In the midst of such family surroundings, his soul breathed his last at the house of his oldest friend in the city. We need hardly add our prayer to those of his friends and the members of his family, that his soul may have rest or rather a large sphere of usefulness in the service of his Master.

    कै. वामन आबाजी मोडक, सी. आय. ई,

    लेखक – नामदार न्सयायमूशतण महादेव गोववांद रानडे (सुबोधपवत्का ता. ५/९/१८९७ च्या अांकातील इांग्रजी मजकुराचें मराठी सार)

    सांत तुकाराम आपल्या पढुील अभांगाांत म्हर्तात. 'आपुलें मरर्, पाफहलें म्या डोळाां I तो जाला सोहळा अनुपम्य II आनांदें दार्टली शतन्सही वत्भुवनें I सवाणत्मकपर्ें भोग जाला II ्कदेशीां होतो अहांकारें आशथला I त्याच्या त्यागें जाला सुकाळ हा II फफर्टलें सुतक जन्सममरर्ाचें I मी माझया सांकोचें दरूीां जालों II नारायर्ें फदला वसतीस ठाव I ठेवूशनया भाव ठेलों पायीां II तुका म्हरे् फदले उमरू्टशन जगीां I घेतले तें अांगी लावूशनयाां II ''मरर् दःुखदायक नाही. आपलें मरर् आपल्या डोळयाांनी मी पाफहलें आहे. तें दृश्य ्क अनुपम सोहळा होता. कारर् तेव्हाां मी जन्सममरर्ाचे दःुखाांतून कायमचा सुर्टलों. नारायर्ानें मला वसतीस ठाव फदला आणर् त्या ठावावर मी राफहलों.''

  • 9

    तुकारामाची वरील उवि, गेल्याच आठवडयाच्या अांकाांत जे फदवांगत झाल्याचें आम्ही उल्लेणखलें त्या कै. वामनराव मोडक याांच्या आत्म्यास णजतकी यथाथणतेनें लावताां येईल शततकी ती या वपढीांतील इतराांस लावताां येर्ार नाहीां. त्याांचा आत्मा अगदीां ख-याख-ुया रीतीनें आपल्या मत्यण देहपाशाांतून गेलीां ४ वर् ेहलके हलके सुर्टका करुन घेत होता. देहाचें ववसजणन हलके हलके होत होतें तरी त्याकडे ते सांताांच्या दृष्टीनें पहात होते. परमेश्वराशीां आपर् तादात्म्य पावर्ार आहों अशी दैवी पे्ररर्ा त्याांस होत असावी असें फदसत होतें. गेल्या ्का वर्ाणच्या अवधीांत काळानें आपर्ाांतून अनेक व्यत्कीांस ओढून नेलें. त्याांच्या कतृणत्वास जरी नुकतीच सुरुवात झालेली होती तरी ते ईश्वरावरील श्रध्देच्या साहाययानें सवण मोहाांचा प्रशतकार करण्यास समथण होतील असा भरांवसा फदसत होता. या सवण व्यत्कीांना असली दैवी पे्ररर्ी वामनरावाांपासूनच शमळाली होती. या दृष्टीनें वामनरावाांना वीर म्हर्ावें लागतें. ४ वर्ोपूवीपासून त्याांचीां गात्ें अधोगवायूनें गशलत झालीां होतीां. परांतु त्याांचे मन शन बुणध्द हीां ईश्वराचणनेमध्यें गुांग झालेली होती. महाभारतकालीन प्रशसध्द (भीष्म) आचयाांप्रमार्ें त्याांचे शरीर कठीर् शैय्येवर पडलें होते. त्याांचे शररराांत अधोगवायूचे प्रार्घातक शर शशरले होते, परांत ुत्याांनी त्याबद दल ्खादाफह दःुखोद्गार काढला नाहीां. त्याांचा आत्मा शाांत शन शरर् झाला होता. आणर् तो जगदात्म्याशीां समरस होता. जे लोक त्याांच्या दःुखाांत सहभागी होण्याकररताां येत त्याांचे साांत्वन ते ज्ञानपूर्ण शलिदाांनी करीत. ईश्वरोपासनेकररताां साठ वर्ोचे तप त्याांनी केलें होतें शन तपानें त्याांचें ज्ञान पररपक्व झालें होतें. आपर्ाांस आर्खी काांहीां वर् े मागणदशणन करण्याकररताां शन आपला उत्साह वाढववण्याकररताां त्याांना अशधक आयुष्य लाभर्ें जरुर आहे, असें आपर्ा सवोना वार्टत होतें आणर् तें ्वाभाववक होतें. परांतु तसें देवाजीच्या मनाांत नव्हतें. ईश्वरानें त्याांना आपर्ाांतून नेलें याबदद ल तक्रारच केली पाफहजे अशी मात् ण्थशत नाहीां. आपलें जीववतकायण पूर्ण करण्याइतकें आयुष्य त्याांना लाभलें होतें आणर् जगराहार्टीप्रमार्ें ववचार करताां इतपत आयषु्यमानाचीच आपर् साधारर् अपेक्षा करावी. त्याांनी शशक्षकाचें काम ३० वर् ेकेलें तेव्हाां त्याांच्या साणन्सनध्याांत ज्या शेंकडों काां हजारों शशष्याांनी अध्ययन केलें त्याांच्या शचतीराांत त्याांची ्मशृत हा अमोशलक ठेवा राहीलच. परांतु ज्या माझ्यासारख्या शमत्ाांनीां त्याांच्याबरोबर आजवर ४० वर् े त्याांच्या आशा शन मनीर्ा याांच्या शसध्दीकरताां सहकायण केलें, त्याांच्या ह्रदयात वामनरावाांची मूती कायमची वसतीस राहील आणर् ती कालाांतरीांफह हलर्ार नाहीां., वामनरावाांशीां केवळ प्रसांगोत्पात सांबांध आला तरी त्यामुळे त्याांच्या सहवासाचा पररर्ाम आपर्ावर होई शन आपल्या मनाचा शन ह्रदयाचा पालर्ट झाला असा अनुभव येई. त्याांच्याशीां ज्याांचा अशधक पररचय होई त्याांच्या मनाांत त्याांच्याववर्यीां आदर शन आश्वयण या भावना उत्पन्सन होत. त्याांच्याशी सांभार्र् करण्याची सांशध शमळाली कीां, त्याांची साधी राहर्ी शन उच्च ववचारसरर्ी अत्यांत कठीर् ह्रदयासही पाझर फोडीत. त्याांचा मदृ ु शन गोड आवाज शन त्याांचे मराठी भारे्चें प्रभुत्व याांची मोहनी मनुष्यावर पडून तो आपल्या शचांता, महतवाकाांक्षा, आशा, शनराशा या सवण ववसरुन जाई आणर् त्यास उच्च लोकाांत वास केल्याचा अनुभव येई. त्याांचे इांग्रजी भारे्वर चाांगलेंच प्रभुत्व होतें. परांतु इांग्रजी भारे्पेक्षाांफह मराठी

  • 10

    भारे्वरचें त्याांचे प्रभुत्व उत्कृष्ट होतें. मराठीांतील विृतवाच्या बाबतीांत त्याांच्याशीां ्कासही बरोबरी करताां येत नव्हती. त्याांचा आवाज म्हर्जे पूर्ण शमलन झालेलें सांगीत असे. त्याचा गुर् शामक होत असल्यामुळें मनुष्याांतील मनोववकार शन उदे्वग ववलयास जात. उतीरम आत्मसांयमानें आत्मतांत् केलेल्या बुध्दीस सुचलेलेस ववचार योग्यच असतात आणर् मनुष्याचें भार्र् त्याच्या ववचारानुरुप असतें, वामनरावाांशीां ज्याांचा दृढ पररचय होता त्याांच्या असें अनुभवास आलें होतें कीां, वामनरावाांत सांयमन, औदायण, भूतदया, धमणभावोशचत आदर, सत्यवप्रयता हे गरु् जन्समजातच होते शन त्यास त्याांनी आत्मशनयमनानें पररपूर्णता आर्ून त्याांचा मधरु पररपाक केला होता. काहीां लोकाांना असें वार्टतें कीां, हल्लीांच्या पुढ़ा-याांत चाररत्र्यववशेर् आणर् ्वतांत् ववृतीर नाही. त्याांचे हे मत आमच्यातील उतीरम पुरुर्ाबद्दल पूर्ण माफहती न शमळाल्यामुळे होत असले पाफहजे.वैशशष््यपर्ण चाररत्र्याचा शन ्वतांत् वतृीरीचा उतीरम पुरुर् म्हर्ून कोर्ाकडे बोर्ट दाखववताां येत असेल तर तें कै.वामनरावाांकडेच दाखववताां येईल. मात् वामनराव ्वतः ्वतांत् वतृीरीचे असले तरी त्याांनी दसु-याच्या ्वतांत् वतृीरीस केव्हाांफह दखुववलें नाही. त्याांना अनेक बाबी अवप्रय भासत. पर् ते आपली अवप्रयता आपर्ाजवळच ठेवीत. दसु-याांशीां वागताांना ते उदार वतृीरीची आणर् कोमलतेची मूशतणच असत. ३० वर्ोपूवी ववधवावववाहाच्या उतेीरजनथण चालववलेल्या चळवळीमुळें जीां सांकर्टें उद भवलीां त्या सांकर्टकाळीां पुरार्मतवादी ब्राम्हार्ाांच्या मुख्य कें द्र्थानीां वामनरावाांनी ्कर्टयाांनीच त्या सत्कायाणथण लढा चालववला. त्याांना सवण बाजूांनीां अनेक उपद्रव सहन करावे लागत असताांनाफह त्याांनी त्या सत्कायाणकारताां त्या सवाणस तोंड फदलें. पर् त्याांनी कधीांफह उदे्वगाचा शन रागाचा शलिद काढला नाहीां. ्वढेंच नव्हे तर ज्याांनी त्याांना अखेरकालापयांत त्ास फदला, त्याांच्याबदद लफह त्याांनी कोमल भावनाच ठेवल्या. या देशाांतील सांताांनी शन ततवद्रष्टयाांनी आपल्या वतणनाांत हा ण्थतप्रज्ञतेचा ववशेर् गुर् दाखववला आहे. रा. मोडकाांनी कालाला उशचत अशा ्वरुपाांत शन आपल्या शविनुसार या गुर्ाचें अनुकरर् केलें. सामाणजक आणर् धाशमणक सुधाररे्कररताां त्याांनी जे प्रयत्न केले त्याांत ते सत्यशनषे्ठपासून केव्हाांफह ढळले नाहीांत. ते सत्यशनष्ठ असूनफह त्याांच्या शलिदाांत शन कृत्याांत दसु-याांना दखुववण्याची ववृतीर केव्हाांही आढळली नाही. सवाणना असेंच आढळून येई कीां वामनराव हे पट र्टीचे आत्मापणर् करर्ारे होते, परांतु त्याचे आत्मापणर् आक्रमक ्वरुपाचे नसून आत्मल्केशाचें असे. वामनराव आपल्याांत नाहीांत ही उर्ीव अनेक सामाणजक कायणके्षत्ाांत भासेलच. परांतु धाशमणक कायणके्षत्ाांत ती ववशेर्च भासेल. त्याांनी आपल्या आयुष्याचा उत्कृष्ट भाग या कायाणकडे खचण केलेला होता आणर् सेवाशनवतृीर झाल्यापासून त्या कायाणकडेच त्याांचें ववशेर् लक्ष होते. धमणश्रध्देच्या बाहय अांगाकडे आणर् ववशधववशेर्ाकडे त्याांचे दलुणक्षच असे. ख-या धमणततवाांची रुजवर् त्याांच्या हृदयात उत्कृष्ट रीतीांने झालेली होती शन धमणममण त्याांना पूर्ण अवगत झालेलें होते. म्हर्ूनच ते धाशमणक के्षत्ास ववशेर् रीतीनें योग्य म्हर्ून शोभत. ्वभावानेंच ते भावपूर्ण होते शन त्याांचा तो भाव प्रकर्ट होऊन आपर्ास काही उत्कृष्ट उपासना पर्थ्ये शमळाली आहेत. वामनरावाांची ईश्वरसाशनध्यता तांत्मय नव्हती. ते ईश्वराचें साशनध्य प्रत्यक्ष अनुभवीत असत.

  • 11

    ईश्वराशीां समरस झाल्याचा अनुभव हेंच त्याांचे श्रषे्ठ धन होतें. त्याांनी आपला आध्याणत्मक उध्दार पूर्ण केला होता. कै. केशवचांद्रसेन याांनी ्थापन केलेल्या ब्राम्हसमाजाच्या चळवळीववर्यीां वामनरावाांची पूर्ण सहानुभूशत होती. असे असूनफह केशवचांद्राांच्या उतीरर आयुष्याांतील चळवळीांत जो ्काांगीपर्ा शन जी ववसांगशत शशरली आणर् केशवचांद्र सेना सांबांधी जो गैरसमज पसरला त्याबदद ल याांना खेद होई. त्या चळवळीस शेवर्टी जे रुप आले ते वामनरावाांस पूर्णतः मान्सय नव्हते. तरीफह या प्राांताांत केशवचांद्राबदद ल ज्याांनी आपल्या पे्रमभावना कायम ठेवल्या होत्या त्याांपैकी वामनराव हे ्क होते. सेवाशनवतृीरीनांतर वामनरावाांना आरोग्य शन सामर्थ्यण लाभले असते तर महवर्ण देवेंद्रनाथ र्टागोर याांना बांगालमध्यें, तसेच फहांदु् थानाांत ज्या ज्या फठकार्ी,त्याांची माफहती होती त्या त्या फठकार्ी जें मानाचें ्थान शमळालें तेंच वामनरावाांसही शमळाले असतें. त्याांचा ्वभाव शन सांवयी याांचा ववचार केला तर धाशमणक सुधारर्ा करर्ा-या इतर बांगाली पुढा-याांपेक्षाां महर्ीशीच त्याांचे अशधक सादृश्य होते. वामनरावाांनी काही उपशनर्दाांची भार्ाांतरें करुन आपलें सां्कृत भार्ेंतील प्रावीण्य प्रत्ययास आर्ून फदलें आहे. ते मान्सय सां्कृत पांफडत होते तरी त्याांनी देशभार्ाांना हीन लेखनू त्याांच्या योग्यतेकडे दलुणक्ष केलें नाहीां. त्याांनी देशभार्ेंतील वाड .मयाचा गाढ अभ्यास केला होता आणर् देशभार्ाांना ववश्वववद्यालयाच्या शशक्षर्ाांत ्थान शमळावें म्हर्ून प्रयत्न केले. ववश्वववद्यालयाच्या इशतहासाांत वामनरावाांच्या नावाची नोंद या कायाणमुळें प्रशसध्दपर्ें होईल. या प्रयत्नाांस त्यावेळी यश शमळाले नाही हें खरें. परांतु आरांभीां शमळालेलें अपयश अखेर शमळर्ा-या यशाची पायरी ठरत असतें. सामान्सय जनतेस वामनरावाांची ओळख शशक्षक या नात्यानेंच अशधक आहे. ते शश्त राखर्ारे शशक्षक होते. परांतु त्याांच्या शश्तीांत भयाचा अांश नसून, पे्रमाचा भाग मुख्य होता. अशा प्रकारची पे्रममय शश्त ठेवण्याांत त्याांनी ववशेर् यश शमळववल्यामुळें त्याांच्या वररष्ठ अशधका-याांनी त्याांना मुांबई इलाख्याांतील अत्यांत नामवांत ववद्याल्याच्या प्रमुखाचे जागीां नेमलें शन वामनरावाांच्या गुर्ाांचे चीज झालें. वामनराव या महतवाच्या हुद्द्द्यावर नेमलेले पफहलेच फहांदी पदवीधर होते. आपल्या दहा वर्ाणच्या कारकीदीत त्याांनी त्या ववद्याल्याची कीशतण कायम ठेववली ्वढेंच नव्हे तर तीत आर्खी भर घातली आणर् ते ्तुतीस पात् झाले. त्याांच्या अनेक ववद्यार्थ्याणनी त्याांच्या शालाशासन पध्दतीबद दल आत्म्फूतीांने ्तुशतपर उद्गार काढले आहेत. वररष्ठ अशधका-याांनी केलेली शनवड योग्य होती हेंच त्या उद्गाराांवरून शसध्द झालें. राजकीय प्रगतीकररताां चाललेल्या प्रयत्नाांशीां रा. मोडक याांची सहानुभूशत नव्हती असें कोठें तरी वाचलेलें ्मरते . यासांबांधी व्तुण्थशत साांगण्याचा अशधकार कोर्ास असला तर तो या पररचयलेखकास आहे असें ववश्वासानें म्हर्ताां येईल. त्या अशधकारपरत्वें मोडक याांच्या पश्वात मी असा शनःशांक अशभप्राय देतों कीां रा. मोडक याांचे राजकारर्ाकडे दलुणक्ष होतें शन त्यास केवळ सामाणजक आणर् धाशमणक सुधारर्ा वप्रय होत्या हे ववधान रा. वामनरावाांच्या सांबांधानें तर फार अन्सयायकारक आहे. राजकीय प्रगतीबदृल आ्थापूवणक ववचार करर्ाराांपैकीच

  • 12

    ते ्क होते. परांतु देशाशभमान याचा काही लोक अगदी उथळ अथण कररतात, तशा उथळ अथाणचें त्याांचे राजकारर् नव्हते. त्याांची अशी शनष्ठा होती की, सषृ्टीांच्या सवण व्यवहाराांत जशी व्यवण्थत प्रगशत असते तशीच व्यवण्थत प्रगशत राजकारर्ाांतफह इष्ट आहे. आणर् या शनणश्वत मतापासून ते कधीफह ढळले नाहीांत. योग्य प्रगशत दीघणकालीन शश्तीनें आणर् अांगी मुरलेल्या उतीरम चाररत्र्याच्या साह्यानें घडून आली पाफहजे, ती केवळ तत्काशलक ववकारानें घडून येऊ नये असें त्याचें शनणित मत होते. आमच्या फदवांगत शमत्ाच्या वतणनक्रमाचें त्ोर्टक वर्णन केलें त्यावरुन त्याांच्या मतृ्यनेू आपली कधीांफह भरुन न येर्ारी हाशन झाली आहे असें आपर् म्हर्टलें तर तें यथातर्थ्यच होईल. त्याांच्या आयुष्याांत त्याांना जे कष्ट झाले आणर् जी दःुखें सहन करावी लागलीां ती त्याांच्या घराांतील पे्रमळ वातावरर्ानें हलकीां झाली. सवण सुखदःुखाचे प्रसांगी त्याांच्या भायचेें त्याांना सहभाशगत्व लाभलें आणर् त्यामुळे त्याांचे घर त्याांस ववशेर् आकर्णक झाले. फकत्येकाांची अशी भ्रामक समजूत असते कीां फहांदी लोकाांच्या घराांत पे्रम आणर् भवि याांचे वा्तव्य नसतें. याांच्या चार वर्ाणच्या दीघणकालीन आजाराांत रखमाबाईनी जी त्याांची सेवा केली शतची माफहती या वावदकूाांनी शमळवावी म्हर्जे त्याांचे भ्रमशनरसन होईल. असल्या धमणशनष्ठ पशतव्रता फहांदी णस्त्रयाांत आहेत हे सत्य त्याांना अशभमान वार्टण्यासारखेंच आहे. शेवर्टच्या ४ वर्ाणच्या आजाराांत आपल्यापुढें वाढून ठेवलेलें तार्ट (भववतव्य) रखमाबाईना ्पष्ट फदसत होते. तथावप वामनरावाांना बाहेर घेऊन जारे्, त्याांच्या खाण्यावपण्याची, और्धोपचाराांची इत्याफद ववववध लहानसहान उपचाराांची व्यव्था आगाऊ आणर् दक्षतेनें करण्याांत त्याांनी कोर्ताफह उरे्पर्ा राहू फदला नाही., आपले दःुख बाजूस सारुन आपलें कतणव्य अखेरपयांत पार पाडीत गेल्या. वामनरावाांच्यापुढें त्या कधीांफह दःुखी मुदे्रनें आल्या नाहीांत ्वढेंच नव्हे तर आपर्ाांस काही शचांता आणर् व्यथा बाधते आहे असें कधीांफह त्यानीां दाखववलें नाही. आणर् त्यामुळे वामनराव सदोफदत आनांफदत राफहले. त्या देवतेस साजर्ारीां त्याांची मुलेंफह आपल्या मातेचें अनुकरर् करीत आणर् आपले दःुख बाजूस सारुन रुग्र्शय्येवर पडलेल्या आपल्या वपत्याची सेवा अवर्णनीय धयैाणनें करीत. अशा पे्रमळ कौरु्टांवबक पररवाराांत असताांना या शहराांतील (मुांबईतील) आपल्या दीघणपररशचत शमत्ाच्या घरीां त्याचे प्रार् पांचत्वाप्रत पोंचले त्याांच्या अनेक शमत्ाांप्रमार्ें आणर् त्याांच्या कुरु्टांबीयाांप्रमारे् आपर् आपल्यापुरती तरी ईश्वराची अशी प्राथणना करुया कीां त्याांना सद्गती शमळावी. फकां वा सद्गती याचा खरा अथण म्हर्जे ईश्वराची अशधक सेवा करण्यास त्याांना अशधक वव्ततृ आणर् योग्य के्षत् शमळावें. हे श. १८०३ मध्ये नाशशक आणर् त्र्यांबकला गेले होते. भायाण रखमा (मनकणर्णका) ज. स. १८४७, म.ृ स. १९०७ जाने. २५ शशक्षर् घरीांच झालें. मराठी शलफहताां वाचताां येत होतें. वर न्सया. रानडयाांच्या लेखाचे अवतरर् फदले आहे. त्याांत त्याांच्या ्वभावाचे काही फदग्दशणन होते. घोडयावर बसण्यात पर्टाईत वप. नारायर् भेर्ट जोशी अग्नीहोत्ी, पालगड वववाह सन १८५४ कन्सया (१) यमू (अन्सनपूर्ाण) ज. स. १८६७ म.ृ स. १९१५ भ्र. माधवराव आपरे्ट, धुळे, (२) माणर्क (लक्ष्मी), ज. स. १८७२ म.ृ स. १९१३ जून १६ शशक्षर् इांग्रजी ४ थी पयणत. भ्र. डॉ.

  • 13

    श्रीपाद गोववांद रानडे. या माणर्कबाईनी पतीबरोबर ववलायतचा प्रवास केला होता. याांचे नावे सांगीतात पाररतोवर्कें देण्याकररताां याांच्या पतीांनी ब-याच मोठया रकमा ठेववल्या आहेत. आणर् ती प्रशतवर्ी फदली जातात. (३) चांद्रभागा (रमा), ज. स. १८७८ म.ृ स. १९०७ शशक्षर् इांग्रजी पयांत भ्र. रामचांद्र बळवांत करांदीकर, वकील, धारवाड. वव. स. १८९२.