ऋग्वेद - एक शोधयात्रा

Post on 14-Nov-2014

43 Views

Category:

Documents

2 Downloads

Preview:

Click to see full reader

DESCRIPTION

जगाच्या इतिहासात वेदांना मानाचे स्थान आहे. ग्रंथालयातील पुरातन ग्रंथांच्या मालिकेत प्रथम क्रमांक आर्यांच्या "ऋग्वेद" ग्रंथाचा आहे. आरण्यके व उपनिषदे यातील जगन्मान्य तत्त्वज्ञानाचा पाया वेदग्रंथात घातला गेला आहे. ऋग्वेदातील ज्ञान आणि विचार याचा परामर्ष इतर तिन्ही वेदात आढळून येतो. ऋग्वेदरचनाकर्ते हे द्रष्टे ऋषी आहेत. इतर पुरातन संस्कृतींची स्मारके वस्तुरूपाने आहेत तर वैदिक वाङ्‌मयाची स्मृती ग्रंथरूपाने उपलब्ध आहे. उच्चारशास्त्र व कंठपरिपाठाचे महत्त्व श्रेष्ठ मानल्यामुळे 'मूळ ग्रंथ जसे होते तसेच आज अभ्यसिता येतात' हे एक महद्‍आश्चर्यच होय. सर्व अवकाशव्यापी उदक आणि हिरण्यगर्भ यांचा विश्वोत्पतीतील सहभाग, विराटपुरुष आणि जीवपुरुष यांचे वर्णन, परमतत्त्व एकच असते व त्याची विभिन्न रूपे म्हणजे देवता, उषःकालाचे सुंदर वर्णन, अश्विनौ आणि इंद्र यांचे मानव कल्याणार्थ अद्‍भुत पराक्रम, उपकारकर्त्या पण रौद्र व उग्र रूप धारण केलेले मरुत् व रुद्र देवता - असे विविध मनोहारी विषय ऋग्वेदात आढळतात. या सर्व विषयांचा परामर्ष घेणारा हा ग्रंथ वाचून ज्ञानाचा बोध व आनंद मिळविण्यासाठी ऋग्वेदाचा मुळातून अभ्यास करण्यास उद्युक्त करणारा हा ग्रंथ. ----------------------------------------------हा ग्रंथ लेखकाच्या अनुमतीनेच इथे उधृत केलेला आहे.

TRANSCRIPT

top related