श्रीमत् ग्रंथराज दासबोधाची -...

Post on 27-Jul-2015

1.289 Views

Category:

Documents

6 Downloads

Preview:

Click to see full reader

DESCRIPTION

श्रीमत् हंसराजस्वामी १९ व्या शतकातील एक थोर वेदांती संत होते. स्वामींचे वेदेश्वरी, आगमसार, लघुवाक्यवृत्ती टीका हे ग्रंथ प्रसिद्धच आहेत. हंसराज स्वामींना बालपणापासून समर्थ रामदासस्वामींबद्दल आदर होता. त्यांच्या नित्याच्या वाचनात दासबोध होता. त्यांना गुरुपदेश झाला तोही समर्थ सांप्रदायिकाचाच. समर्थांच्या आकर्षणामुळेच हंसराज स्वामींच्या विवेचनात समर्थांचे अनेक विचार येतात. या आदरातूनच ’संकेत कुबडी’ हा ग्रंथ निर्माण झाला. यात दासबोधाचा सारांश सांगण्यासाठी सुमारे एक बारांश संक्षेपाने एकेका दशकाचे एक प्रकरण केले आहे. ग्रंथाचे १ ते ८ दशकांचा पूर्वार्ध व ९ ते २० दशकांचा उत्तरार्ध असे दोन भाग केले आहेत. स्वामींनी दासबोधातील वेदांताची शास्त्रीय पद्धतीने मांडणी केली आहे. त्यांच्या मते पहिल्या पाच दशकात ’अनुबंध चतुष्टय’ सांगितला आहे. सहाव्यात ब्रह्मात्मैक्य प्रचीतीचे निरूपण, सातवा निःसंदेह ज्ञानाचा दशक आणि आठव्यास ज्ञानदशक म्हटले आहे - आणि अशा रीतीने पूर्वार्धात व्यतिरेक पद्धतीने ज्ञानाचे निरूपण आले असे स्वामींचे मत दिसते. उत्तरार्धातील ९ ते २० दशकात अनेक विषयांची खिचडी जाणवत असली तरी हंसराजस्वामींनी त्यातून केवळ वेदांताचेच प्रतिपादन असल्याचे म्हटले आहे. एका वेदांतनिष्ठाच्या नजरेतून तयार झालेली दासबोधाची ही सविस्तर अवतरणिकाच आहे. दासबोध वाचताना तपशिलात अडकून मुख्यार्थाकडे दुर्लक्ष होऊ नये, पौर्वापर्य संबंध लक्षात राहून सर्व अर्थ मनात ठसावा अशी इच्छा असणारांस हा ग्रंथ उपयुक्त ठरेल.

TRANSCRIPT

top related