देवपुत्राची · 2019-05-07 · देवपुत्राची १००...

124

Upload: others

Post on 02-Mar-2020

11 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

  • देवपुत्राची १०० नावे - डॉ. रंजन केळकर 2

    देवपुत्राची १०० नावे

    डॉ. रंजन केळकर M.Sc., Ph.D.

    Web site: ranjankelkar.wordpress.com Email: [email protected]

    Copyright ©2019 Dr Ranjan Kelkar, Pune, India

  • देवपुत्राची १०० नावे - डॉ. रंजन केळकर 3

    अनुक्रमणिका प्रस्तावना पषृ्ठ ४

    १-२ येश ू ६

    ३-६ णिस्त प्रभ ू १०

    ७-१२ देवाचा पतु्र १५

    १३-१९ घराण्याशी संबंधित नाव े २३

    २०-३० संदेष्टयांनी पवूी ददलेली नाव े ३१

    ३१-४२ समकालीन लोकांनी ददलेली नाव े ४३

    ४३-६४ देवपतु्राने स्वतः सांधितलेली नावे ५६

    ६५-८८ इतरांनी नंतर ददलेली नाव े ८१

    ८९-९६ साववकाललक आणि सववशे्रष्ठ नाव १०६

    ९७-१०० दिब्र ूआणि ग्रीक नाव े ११५

    पररलशष्ट Names of the Son of God in English १२०

    लेखकाववषयी १२४

  • देवपुत्राची १०० नावे - डॉ. रंजन केळकर 4

    प्रस्तावना देवाचा पतु्र ओळखला जातो तो येश,ू णिस्त, प्रभ ूयेश ूणिस्त, मलशिा, मनषु्याचा पतु्र, अशा १२ मलूभतू नावांनी. त्याने पथृ्वीवर मानवरूपात जन्म घेतला तो दाववदाच्या घराण्यात, ज्याच्याशी संबंधित अशी त्याची इतर ७ नाव े आिेत. देवपतु्राच्या पथृ्वीवरील जन्माववषयीच ेभववष्य त्याच्या कािी शतकांपवूीच वतववले िेले िोत.े त े भववष्य सािंिाऱ्या संदेष्टयांनी ११ ववववि नावांद्वारे त्याची पवूवकल्पना त्या काळच्या लोकांना ददली िोती. प्रभ ू येशनेू त्याच े पथृ्वीवरील सेवाकायव सरुू केल्यानंतर त्याच्या समकालीन लोकांना त्याची प्रत्यक्ष ओळख पटू लािली आणि ती त्यानंी १२ नवीन नावातंनू व्यक्त केली.

    प्रभ ू येशनेू स्वतःच तो कोि आिे िे लोकांना सािंण्याचा वारंवार प्रयत्न केला. त्याने स्वतःववषयी केलेल्या वविानातं त्याची २२ नावे आिेत. येशचू्या मतृ्यनंूतर त्याच ेपनुरुत्थान झाले आणि नंतर तो स्विावत वपत्याकड ेपरतला. त्याच्या लशष्यांनी त्याच ेकायव पढेु सरुू ठेवले आणि लोक येशचू्या लशकविीकड ेआकवषवत िोऊ लािले. ह्या काळात पववत्र शास्त्राचा दसुरा भाि म्ििजे नवा करार ललदिला िेला आणि त्यात देवपतु्राच्या आिखी २४ नावांची भर पडली.

    देवपतु्र साववकाललक आणि सववशे्रष्ठ असल्याच े दशवविारी त्याची ८ नाव ेआिेत. शवेटी, ४ नावे अशी आिेत ज्यांच ेपववत्र शास्त्रात मराठी भाषांतर केलेले नािी आणि ती दिब्र ूव ग्रीक भाषातं िोती तशीच ठेवलेली आिेत.

    िी सवव लमळून “देवपतु्राची १०० नाव”े िोतात.

    देवपतु्राची सिळीच १०० नावे त्याला िाक मारण्यासाठी आिेत असे नािी. आपल्याला त्याची खरी आणि पिूव ओळख पटावी म्ििून ती आिेत. पि जािून घेण्यासारखे िे आिे की, आपि त्याला कोित्यािी नावाने िाक मारली तरी तो ती लिेच ऐकतो आणि आपल्यासाठी िावनू येतो. प्रभ ूयेशनेू िे सांधितले िोते की, त्याच्या नावाने आपि कािीिी माधितल ेतर देववपता त ेआपल्याला देईल.

  • देवपुत्राची १०० नावे - डॉ. रंजन केळकर 5

    देवपतु्राच ेनाव कदाधचत आपि ववसरू. पि देववपत्याच्या तळिातावर आपली नावे ललदिलेली आिेत, असे पववत्र शास्त्रात म्िटलेले आिे. तो आपल्याला किीिी ववसरिार नािी ककंवा सोडिार नािी. वपता, पतु्र आणि पववत्र आत्मा नेिमीच आपल्याबरोबर असतात.

    “देवपतु्राची १०० नाव”े िे माझ ेई-पसु्तक वाचकांना सादर करताना मला अत्यानंद िोत आिे. इंग्रजी भाषते ह्या ववषयावर कािी पसु्तके उपलब्ि आिेत. त्यातील “नेम्स ऐंड टाइटल्स ऑफ जीझस” िे चाल्सव स्पीअर ह्यांनी १८४१ साली ललदिलेले एक पसु्तक मला इंटरनेटवर सापडले आणि त ेमी संदभावसाठी वापरले. पि माझ ेपसु्तक अशा कोित्यािी पसु्तकाच ेभाषातंर नािी. ह्यातील ववचार, मांडिी आणि शलैी सववस्वी माझी आिे. पववत्र शास्त्राच्या माझ्या स्वतःच्या अभ्यासावर आणि परमेश्वराकडून वेळोवेळी लमळालेल्या प्ररेिेवर त ेआिारलेले आिे. मी ललखाि करत असताना मला परमेश्वराच्या सान्न्नध्याचा सतत अनभुव आला आणि त्याच्याच कृपेमळेु व मािवदशवनामळेु मी िे काम पिूव करू शकलो. माझ्या वाचकांनािी परमेश्वराचा आशीवावद प्राप्त व्िावा अशी माझी त्याच्या चरिी प्राथवना आिे.

    पिेु, ७ मे २०१९ - रंजन केळकर

  • देवपुत्राची १०० नावे - डॉ. रंजन केळकर 6

    येश ू

    1. पववत्र बालक 2. येश ू

  • देवपुत्राची १०० नावे - डॉ. रंजन केळकर 7

    १. पववत्र बालक

    बायबल, म्ििजे पववत्र शास्त्र, एक अखंड गं्रथ नािी. ववववि स्वरूपाच्या, लिानमोठ्या, विेविेळ्या लेखकांनी ललदिलेल्या, अशा ६६ पसु्तकांचा तो एक संग्रि आिे. त्यातील पदिली ३९ पसु्तके णिस्तपवूव सन अंदाजे १४०० त े४०० ह्या काळात ललदिली िेली आणि त्यांना एकत्रत्रतपिे जुना करार असे म्िटले जाते. नंतरची २७ पसु्तके इसवी सन समुारे ५० त े १०० दरम्यान ललदिली िेली आणि त्यांना एकत्रत्रतपिे नवा करार असे म्िटले जात.े

    जुन्या करारातील अनेक पसु्तके कािी ववलशष्ट लेखकांची आिेत ज्यांना त्या काळी संदेष्टा मानले जाई. संदेष्टे िे परमेश्वराशी संवाद सािनू त्याच े ववचार आणि संकल्प लोकांना समजावनू सांिायच ेकायव करायच.े संदेष्टे एका अथी भववष्यवादी िोत.े कारि भववष्यात घडिाऱ्या िोष्टींची पवूवकल्पना त ेलोकानंा वेळोवेळी देत असत.

    पापी मानवाच्या तारिासाठी देवाचा पतु्र पथृ्वीवर मानवरूपात जन्म घेिार आिे ह्याववषयीची भववष्यवािी त्याच्या जन्माच्या समुारे ७०० वषाांपवूी यशया नामक संदेष्टयाने वतववली िोती. यशयाने आपल्या भववष्यवािीची सरुुवात अशी केली की, “आमच्यासाठी बाळ जन्मला आिे, आम्िाला पतु्र ददला आिे.” (यशया ९:६) देवाचा पतु्र भतूलावर एका तान्ह्या बाळाच्या रूपात येईल िे यशयाला ह्यांतून सांिायच ेिोत.े त्यानंतर सात शतके लोटल्यावर ती भववष्यवािी पिूव व्िायची वेळ आली.

    देवाने त्याच्या पतु्राला पथृ्वीवर जन्म देण्यासाठी िालललातील नासरेथ िावच्या एका कुमाररकेला ननवडले. नतच ेनाव मररया िोत ेआणि योसफे नावाच्या एका मािसाला ती वाग्दत्त िोती. देवाने त्याचा एक दतू ित्रब्रएल नतच्याकड ेपाठवला आणि त्याने मररयेला सवव कािी समजावनू सांधितले. तो नतला म्ििाला की, पववत्र आत्मा नतच्यावर उतरेल, आणि परात्पराची शक्ती नतच्यावर छाया करील. पववत्र आत्म्याच्या योिे नतच्या पोटी िभव रािील. ती एका पववत्र बालकाला जन्म देईल जो पववत्र देवाचा पतु्र असेल. (लकू १:२६-३८)

    त्या ददवसातं असे झाले की, सवव रोमी साम्राज्याची जनििना करण्याच े कैसर औिुस्त ह्याने ठरवले. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आपआपल्या िावी जावे लािले. मररया िरोदर असतानािी, योसफे नतला बरोबर घेऊन यिुददयातील बेथलेिेम िावी

  • देवपुत्राची १०० नावे - डॉ. रंजन केळकर 8

    नावननशीसाठी िेला. बेथलेिेम िे दाववदाच ेनिर िोत ेआणि योसेफ दाववदाच्या घराण्यातला िोता. तथेे नावननशीसाठी आलेल्या लोकांची िदी झाली िोती आणि योसेफ व मररया ह्यांना उतारशाळेत रािायला जािा लमळेना. त्याच वेळी नतच ेप्रसतूीच े ददवस पिूव िोऊन नतन े बाळाला जन्म ददला आणि त्याला बाळंत्यातं िुंडाळून एका िव्िािीत ठेवले. (लकू २:१-७)

    णिस्तजयतंीचा सि साजरा करताना णिस्तजन्माच ेजे दृश्य उभे केले जात ेत्यात िोठा, त्यातील जनावरे, िव्िािीतील बाळ, त्याची काळजी घेिारे योसेफ व मररया, त्याला बघायला आलेले मेंढपाळ, उंटावर प्रवास करून आलेले तीन मािी लोक, आणि वर आकाशात तारा, िे सवव कािी आवजूवन दाखवले जाते. पि ह्या सवव दृश्याच्या कें द्रस्थानी असतो तो पववत्र बालक.

    देवाचा पतु्र िा पववत्र बालक म्ििून जन्माला आला. तो देवाच्या कृपेत आणि ज्ञानीपिात वाढत िेला. (लकू २:४०,५२) तो पववत्र जन्मला एवढेच नािी तर तो शवेटपयांत पववत्रच रादिला. त्याची सवव बाबतींत परीक्षा झाली तरी तो ननष्पाप रादिला. (इब्री. ४:१५) त्याने पाप केले नािी व त्याच्या मखुात कािी कपट आढळले नािी. (१ पेत्र २:२२)

    देवाची इच्छा िी आिे की, जसा तो पववत्र आिे तसेच आपििी पववत्र व्िावे. (१ पेत्र १:१५-१६)

    २. येश ू

    देवाचा पतु्र मानवरूपात पथृ्वीवर जन्म घेिार आिे िे अनके संदेष्टयांनी आिीच सांधितलेले िोत.े पि िे घडून यावे म्ििून देवाने त्यासाठी जी योजना आखलेली िोती नतच्यात मररया नावाच्या एका कुमाररकेचा मित्त्वाचा सिभाि अपेक्षक्षत िोता. कारि देवाचा पतु्र पववत्र आत्म्याच्या द्वारे नतच्या पोटी जन्म घेिार िोता. म्ििून सववप्रथम देवाने त्याचा दतू ित्रब्रएल ह्याला नतच्याकड ेपाठवले. देवदतूाने मररयेला देवाची सवव योजना स्पष्ट केली एवढेच नािी, तर नतने नतच्या िोिाऱ्या बाळाच ेनाव काय ठेवायच ेिेसदु्िा त्याने साधंितले.

    देवदतू म्ििाला की, “मररये, देवाची कृपा तुझ्यावर झाली आिे. तुझ्या पोटी िभव रािील, आणि तुला पतु्र िोईल; आणि त ूत्याच ेयेश ूिे नाव ठेव.” (लकू १:३०-३२) मररया िी योसेफाची वाग्दत्त वि ूिोती. योसेफाचा कािी िैरसमज िोऊ नये म्ििून

  • देवपुत्राची १०० नावे - डॉ. रंजन केळकर 9

    देवदतू त्यालािी स्वप्नात प्रिट झाला आणि म्ििाला, “दावीदपतु्र योसेफा, त ूआपली पत्नी मररया दिला आपल्याकड ेआिायला लभऊ नको, कारि नतच्या पोटी जो िभव रादिला आिे तो पववत्र आत्म्याकडून आिे. नतला पतु्र िोईल, आणि त ूत्याच ेयेश ूिे नाव ठेव. कारि तो आपल्या लोकांना त्यांच्या पापांपासनू तारील.” (मत्तय १:१८-२५)

    बाळाच्या जन्मानंतर आठव्या ददवशी यिुदी प्रथेनसुार मररया आणि योसेफ ह्यांनी त्याच ेनाव येश ूअसे ठेवले. (लकू २:२१)

    पववत्र शास्त्रातील नवा करार मळुात ग्रीक भाषते ललदिलेला आिे, जी त्या काळी एक संपकव भाषा म्ििनू प्रचललत िोती. त्यात देवपतु्राच ेनाव ग्रीक भाषते “Iesous” असे ललदिलेले आिे. त्याचा उच्चार कािीसा “इएससू” असा आिे. ग्रीक नव्या कराराच ेइतर भाषांमध्ये भाषांतर करताना “Iesous” चा अनवुाद इंग्रजीत “Jesus”, दिदंीमध्ये “यीश”ू, उदूवमध्ये “ईसा”, मराठीत “येश”ू, अशा ववववि प्रकारे केला िेला. कािी नवीन इंग्रजी भाषांतरात त्याला “येशआु” म्िटले आिे. पि त्या सवव नावांमािचा अथव एकच आिे की, तो आपल्या लोकांना त्याचं्या पापांपासनू तारील.

  • देवपुत्राची १०० नावे - डॉ. रंजन केळकर 10

    णिस्त प्रभू

    3. तारिारा 4. णिस्त 5. प्रभ ू6. प्रभ ूयेश ूणिस्त

  • देवपुत्राची १०० नावे - डॉ. रंजन केळकर 11

    ३. तारिारा

    प्रभ ूयेशचू्या जन्माची बातमी सिळ्यात आिी ददली िेली ती रात्री रानात आपल्या कळपांची राखि करीत असलेल्या कािी मेंढपाळांना. ती बातमी इतकी मित्त्वाची िोती की, ती एक देवदतू स्वतः घेऊन आला िोता, जो त्यानंा म्ििाला, “सवव लोकांना जो मोठा आनंद िोईल त्याची मी तुम्िाला सवुाताव सािंतो; कारि आज, दाववदाच्या निरात, तुमच्यासाठी तारिारा जन्मला आिे; तो णिस्त प्रभ ूआिे.” (लकू २:१०-११)

    िी सवुाताव “तुमच्यासाठी” म्ििजे फक्त मेंढपाळांसाठी नव्िती, ती एका ववलशष्ट समाजासाठी, वंशासाठी, ककंवा राष्रासाठी नव्िती, तर जे कोिी ती ऐकतील त्या सवाांसाठी ती िोती. देवाचा पतु्र िा जिाचा तारिारा आिे.

    येशचू्या जन्माची घोषिा देवदतूाने केली, पि जेव्िा प्रभ ूयेश ूस्वतः लोकांना संदेश देऊ लािला, तेव्िा लोक म्ििाले की, “आम्िी त्याच ेऐकले आिे, आणि िा, खरोखर, जिाचा तारिारा आिे, िे आम्िाला समजले आिे.” (योिान ४:४२) संत योिानाने ललदिले आिे की, “आम्िी पादिले आिे आणि साक्ष देतो की, वपत्यान ेपतु्राला जिाचा तारिारा िोण्यास पाठवले. येश ूणिस्त िा देवाचा पतु्र आिे, िे जो कोिी पतकरतो त्याच्यात देव राितो व तो देवात राितो.” (१ योिान ४:१४-१५)

    देवाने जिावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पतु्र ददला ह्यासाठी की, जो कोिी त्याच्यावर ववश्वास ठेवतो त्याचा नाश िोऊ नये तर त्याला सनातन जीवन लमळावे. कारि देवाने पतु्राला जिात पाठवले ते जिाचा न्याय करायला नािी, पि त्याच्या द्वारे जिाच ेतारि व्िावे म्ििून पाठवले. (योिान ३:१६-१७)

    येशचूी सवुाताव सवाांसाठी आिे. तो म्िित असे की, ज्याला ऐकायला कान आिेत तो ऐको. त्या सवुातवेर ववश्वास ठेवायचा की नािी, नतचा स्वीकार करायचा की नािी, िा प्रत्येकाचा वयैन्क्तक ननिवय आिे. आणि म्ििून ती सवुाताव सवव जिाला सांित रािण्याची जबाबदारी प्रभ ूयेशचू्या लशष्यांची आिे. “तुम्िी सवव जिात जा आणि सवव सषृ्टीला सवुाताव सांिा,” िी येशचूी त्यांना शवेटची आज्ञा िोती. (माकव १६:१५)

  • देवपुत्राची १०० नावे - डॉ. रंजन केळकर 12

    ४. णिस्त

    जुन्या करारात णिस्त िा शब्द आढळत नािी. मळू ग्रीक भाषते ललदिलेल्या नव्या करारातील “christos” ह्या शब्दाचा अथव अलभषके केलेला अथवा अलभवषक्त असनू त्याचा मराठी भाषते “णिस्त” असा अनवुाद केलेला आिे. पि देवपतु्र येशलूा नव्या करारात विेविेळ्या संदभावत “येश ू णिस्त” ककंवा “णिस्त येश”ू ककंवा केवळ “णिस्त” ह्या एकाच शब्दाने संबोिलेले आिे.

    एकदा येशनेू त्याच्या लशष्यांना स्वतःववषयी एक प्रश्न ववचारला की, “मी कोि आिे असे तुम्िाला वाटते?” त्यावर त्याचा लशष्य लशमोन पेत्र ह्याने उत्तर ददले की, “तू णिस्त, न्जवंत देवाचा पतु्र आिेस.” येश ूत्याला म्ििाला, “लशमोना, बयोना, तू िन्य आिेस. कारि देिाने आणि रक्तान ेतुला िे प्रकट केले नािी पि माझ्या स्विावतील वपत्यान ेकेले आिे.” (मत्तय १६:१३-१६)

    नव्या करारात संत पौलाने ललदिलेल्या ववववि पत्रांचा समावशे आिे. त्यांमध्ये पौलान ेणिस्त िा शब्द अशा सवाांिीि अथावन ेवापरला आिे की, जि ूत्यात देवाच्या पतु्राच े संपिूव व्यन्क्तत्व सामावलेले आिे. पौलाने ललदिले आिे की, तो णिस्त िाजवतो, (१ कररथं १:२३) त्याला णिस्ताच्या सवुातेची लाज वाटत नािी. (रोम १:१६) पौल म्िितो की, आपि पापी असताना णिस्त आपल्यासाठी मरि पावला. (रोम ५:८) तो ववचारतो की, णिस्ताच्या प्रीतीपासनू कोि आपल्याला वेिळे करील? (रोम ८:३५)

    णिस्ती जीवनाचा सारांश सांिायचा झाला तर तो पौलाच्या ह्या एका लिान पि प्रिल्भ वाक्यात सािंता येईल की, “मी नािी, तर णिस्त माझ्या ठायी जितो.” (िलती २:२०)

    येशनेू आपल्याला सचते केले आिे की, शवेटच्या काळात खोटे णिस्त आणि खोटे संदेष्टे उपन्स्थत िोतील, त ेलोकांना फसवायचा प्रयत्न करतील. कोिी म्िितील की, “बघा, णिस्त येथे आिे” ककंवा “णिस्त तेथे आिे”. आपि त्यांच्यावर ववश्वास ठेव ूनये. (मत्तय २४:२३-२४)

    णिस्त एकच आिे, तो न्जवंत देवाचा पतु्र येश ूआिे.

  • देवपुत्राची १०० नावे - डॉ. रंजन केळकर 13

    ५. प्रभ ू

    िल्लीच्या मराठी भाषते प्रभ ूशब्द फारसा वापरला जात नािी. पि त्याच अथावच ेपयावयी शब्द उदािरिाथव, िनी, स्वामी, मालक, राजा, देव, ईश्वर िे संदभावला अनसुरून वापरले जातात. मोठ्या व्यक्तीनंा संबोिन म्ििून िल्ली कोिी प्रभ ूम्िित नािी. त्याऐवजी त्यांना मिोदय, श्रीमान, सन्माननीय, असे म्िितात.

    पववत्र शास्त्रात मात्र प्रभ ूिा शब्द खूप वेळा आढळतो. कािी संदभाांत तो िनी, स्वामी, मालक अशा सामान्य अथावने वापरलेला आिे. कािी संभाषिांत लोकांनी येशलूा आदराने प्रभ ूम्िटलेले आिे. पि कािी लोकांनी त्याच ेदेवत्व लक्षात घेऊन त्याला “प्रभ,ू आम्िाला वाचवा,” ककंवा “प्रभ,ू आमच्यावर दया करा” अशी आतव िाक मारलेली आिे. (मत्तय ८:२५, २०:३०-३१)

    िा फरक येशलूा नक्कीच जािवला िोता आणि त्याववषयी त्याने बोलनू दाखवले की, “तुम्िी मला ‘प्रभ,ू प्रभ,ू’ तर म्ििता पि मि मी सांितो त्या िोष्टी तुम्िी का करीत नािी?” (लकू ६:४६) प्रभ ूयेश ूअसेिी म्ििाला की, “जो कोिीिी मला ‘प्रभ,ू प्रभ,ू’ म्िितो तो स्विावच्या राज्यात येईलच असे नािी. पि जो माझ्या स्विावतील वपत्याच्या इच्छेप्रमािे करतो तो येईल.” (मत्तय ७:२१-२३)

    येशचू्या पनुरुत्थानानंतर जेव्िा त्यान ेआपल्या लशष्यांना दशवन ददले तेव्िा त्याचा लशष्य थोमा तेथे उपन्स्थत नव्िता. नंतर इतर लशष्यांनी त्यांना येश ूभेटून िेल्याच ेत्याला सांधितल ेतवे्िा तो त ेमानायला तयार झाला नािी. त्याने अट घातली की, “मी त्याच्या िातांत णखळ्यांची खिू बनघतल्यालशवाय, णखळ्यांच्या जािी माझ ेबोट घातल्यालशवाय, आणि त्याच्या कुशीत माझा िात घातल्यालशवाय मी ववश्वास ठेविार नािी.” त्यानंतर आठ ददवसांनी येश ूपनु्िा एकदा आपल्या लशष्यांसमोर आला आणि थोमाला उद्देशनू म्ििाला, “तझु ेबोट पढेु कर, आणि माझ ेिात बघ; तुझा िात पढेु कर आणि माझ्या कुशीत घाल; आणि ववश्वासिीन िोऊ नकोस पि ववश्वास ठेविारा िो.” त्यावर थोमा एवढेच म्िि ूशकला, “माझा प्रभ ूआणि माझा देव!” (योिान २०:१९-२९)

    पववत्र शास्त्रात सांधितले आिे की, शवेटी, प्रत्येक िुडघा येशचू्या नावाने टेकला जािार आिे, आणि येश ूणिस्त िा प्रभ ूआिे, िे प्रत्येक जीभ कबलू करिार आिे. (कफललप ै२:११)

  • देवपुत्राची १०० नावे - डॉ. रंजन केळकर 14

    ६. प्रभ ूयेश ूणिस्त

    “प्रभ ूयेश ूणिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पववत्र आत्म्याची सिभाधिता तुम्िा सवाांबरोबर असो. आमेन.” (२ कररथं १३:१४) ह्या शब्दांनी संत पौलाने कररथं येथील णिस्ती मंडळीला ललदिलेले दसुरे पत्र समाप्त केले आिे. िा आशीवावद इतका सुंदर आणि व्यापक आिे की, तो आजच्या काळातील णिस्ती उपासनेतसदु्िा न ववसरता ददला जातो.

    देवाने जिावर प्रीती केली पि त्याची कृपा प्रभ ूयेश ूणिस्ताच्या द्वारे प्रिट झाली. म्ििून संत पौलाने ललदिलेल्या अनेक पत्रांची सरुुवात “तुम्िाला प्रभ ू येश ूणिस्ताकडून कृपा व शांती असो” अशा आशीवावदाने झालेली आिे. (रोम १:७, १ कररथं १:३, २ कररथं १:२, िलती १:३, इकफस १:२, कफललप ै१:२, कफलेमोन १:३)

    प्रभ ू येश ू णिस्त असे नतिेरी नाव मत्तय, माकव , लकू आणि योिान ह्या चारिी शभुवतवमानांत आढळत नािी. पि नव्या करारातील इतर पसु्तकात, ववशषेतः संत पौलाने ललदिलेल्या ववववि पत्रातं, त ेएकूि ६० वेळा आलेले आिे. देवाच्या पतु्राच ेनाव येश ूतर आिेच पि त्याचबरोबर तो प्रभ ूआिे आणि तो णिस्त आिे िे आवजूवन साधंितले तर त्या नावाला जिू अधिक सामथ्यव प्राप्त झाल्यासारखे वाटत.े

    संत पौलाने ललदिले आिे की, “आपि जाितो की, जिात मतूी िी कािीच नािी. आकाशात आणि पथृ्वीवर पषु्कळ देव आणि पषु्कळ प्रभ ूअसतील. तरी ज्याच्यामळेु सवव झाले तो एक प्रभ ूयेश ूणिस्त आपल्याला आिे, आणि त्याच्यामळेु आपि आिो.” (१ कररथं ८:४-६)

    आपि तारिाऱ् याची, म्ििजे प्रभ ूयेश ूणिस्ताची प्रतीक्षा करीत आिोत िे सांिताना संत पौल असा ववश्वास प्रकट करतो की, तो आपल े दीन अवस्थेतील शरीर त्याच्या िौरवी शरररासारखे व्िावे म्ििून त ेपालटून टाकील.” (कफललप ै३:२०-२१)

    पौल प्राथवना करतो की, “स्वतः आपला प्रभ ूयेश ूणिस्त तुमच्या मनाच ेसांत्वन करो, आणि तुम्िाला प्रत्येक प्रकारच्या चािंल्या कामात व भाषिात न्स्थर करो.” (२ थेसल २:१६-१७)

    यिुदा बोि करतो की, “तुम्िी सनातन जीवनासाठी आपला प्रभ ूयेश ूणिस्त ह्याच्या दयेची प्रतीक्षा करीत स्वतःला देवाच्या प्रीतीत राखा.” (यिुदा १:२१)

  • देवपुत्राची १०० नावे - डॉ. रंजन केळकर 15

    देवाचा पुत्र

    7. परात्पराचा पतु्र 8. देवाचा पतु्र 9. एकुलता एक 10. अलभवषक्त 11. मलशिा 12. मनषु्याचा पतु्र

  • देवपुत्राची १०० नावे - डॉ. रंजन केळकर 16

    ७. परात्पराचा पतु्र

    परमेश्वर सववसमथव, सववव्यापी आणि सववसाक्षी आिे. ज्याने आकाश आणि पथृ्वी ननमावि केली, त्याचा अधिकार आणि त्याची सत्ता अमयावद असिार. आपि कल्पना करू शकत नािी अशा उंचीवर तो असेल, एवढीच आपि त्याच्याववषयी कल्पना करू शकतो. अशा परमोच्च परमेश्वर देवाला पववत्र शास्त्रात अनेक वळेा परात्पर म्िटले िेले आिे. (उत्पत्ती १४:१९)

    परमेश्वर परात्पर व भयप्रद आिे; तो अणखल पथृ्वीचा मिान साववभौम राजा आिे. (स्तोत्र ४७:२) दावीद ललदितो की, “परात्पर देवाचा, माझ े सवव कािी लसद्िीस नेिाऱ् या देवाचा, मी िावा करीन.” (स्तोत्र ५७:२)

    देवदतू ित्रब्रएल मररयेची भेट घ्यायला नतच्या घरी िेला िोता तेव्िा त्यांच्यात झालेले संभाषि संत लकू ह्याच्या शभुवतवमानात नोंदलेले आिे. सािन्जकपिे ती अस्वस्थ झाली, पि ित्रब्रएल नतला म्ििाला, “मररये, लभऊ नको, कारि देवाची कृपा तुझ्यावर झाली आिे. आणि बघ, तुझ्या पोटी िभव रािील, आणि तुला पतु्र िोईल; आणि त ूत्याच ेयेश ूिे नाव ठेव. तो मिान िोईल आणि त्याला परात्पराचा पतु्र म्िितील.” त्यावर मररयेन ेववचारल ेकी, “िे कसे िोईल? कारि माझा परुुषाशी संबंि नािी.” तेव्िा देवदतू नतला उत्तर देऊन म्ििाला, “पववत्र आत्मा तुझ्यावर उतरेल, आणि परात्पराची शक्ती तुझ्यावर छाया करील. आणि म्ििून ज्याचा जन्म िोईल त्याला पववत्र, देवाचा पतु्र म्िितील.” (लकू १:२६-३८)

    ववशषे म्ििजे ज्याला परात्पराचा पतु्र म्िटलेले आिे त्याने सामान्य लोकांना सांधितले की, तेिी परात्पराच ेपतु्र िोऊ शकतील. त्यासाठी त्यांनी काय केले पादिजे तेिी त्याने साधंितले. “तुम्िी आपल्या वऱै् यांवर प्रीती करा आणि त्यांचे बरे करा, आणि कािी परत लमळण्याची आशा न करता उसने द्या; तुम्िाला मोठे प्रनतफळ लमळेल, आणि तुम्िी परात्पराच ेपतु्र व्िाल; कारि तो कृतघ्नांशी आणि दषु्टांशी दयाळू आिे. म्ििून तुमचा वपतािी उपकारी आिे तसेच तुम्िी उपकारी व्िा.” (लकू ६:३५-३६)

    ८. देवाचा पतु्र

    “मी देवाचा पतु्र आिे” असे कोिी स्वतःववषयी म्िटल्याच ेपववत्र शास्त्रात आढळत नािी, पि तो कोि आिे िे त्यातून स्पष्टपिे समजते.

  • देवपुत्राची १०० नावे - डॉ. रंजन केळकर 17

    देवदतू ित्रब्रएल ह्याने जेव्िा कुमाररका मररयेला भेट देली िोती तेव्िा त्यान ेनतला सांधितल ेिोत ेकी, पववत्र आत्म्याच्या योिे नतच्या पोटी िभव रािील आणि नतला पतु्र िोईल, आणि नतने त्याच ेनाव येश ू िे ठेवायच ेआिे. त्याबरोबरच देवदतूाने मररयेला िेिी साधंितले की, त्याला देवाचा पतु्र म्िितील. (लकू १:३१,३५)

    मत्तयाच्या शभुवतवमानात िे नमदू केलेले आिे की, येशचूा बान्प्तस्मा झाला त्यावेळी आकाश उघडले, देवाचा आत्मा कबतुरासारखा त्याच्यावर उतरला आणि आकाशातून एक वािी म्ििाली की, “िा माझा वप्रय पतु्र आिे, ह्याच्याववषयी मी संतुष्ट आिे.” (मत्तय ३:१६-१७)

    मत्तय आणि माकव ह्यांच्या शभुवतवमानांत आिखी एका ववशषे घटनेच ेविवन आिे. ती अशी की, प्रभ ू येश ू लशमोन पेत्र, याकोब आणि योिान ह्या त्याच्या तीन लशष्यांबरोबर एका डोंिरावर िेला असता तेथे त्याच े रूपातंर झाले िोत.े एका तेजस्वी ढिाने त्याच्यावर आणि त्याच्या लशष्यांवर छाया केली, आणि त्या ढिातून एक वािी म्ििाली की, “िा माझा वप्रय पतु्र आिे, ह्याच्याववषयी मी संतुष्ट आिे. ह्याच े ऐका.” (मत्तय १७:५, माकव ९:७) पेत्रान े त्याच्या पत्रात त्या घटनवेवषयी आपली वयैन्क्तक साक्ष ददली आिे. (२ पते्र १:१६-१८)

    पववत्र शास्त्रातून िे उघड िोते की, आपि देवाचा पतु्र असल्याच ेसािंून येशलूा स्वतःच ेिोरव करून घ्यायच ेनव्िते. त्याच्या लशष्यांवर ककंवा त्याच्या श्रोत्यांवर त्याला भावननक दबाव आिायचा नव्िता. अनकेदा देववपत्याववषयी सािंताना तो स्वतःला फक्त पतु्र एवढेच म्िित असे. जसे, “वपता कोिाचा न्याय करीत नािी, पि त्यान ेपतु्रावर सवव न्याय सोपवला आिे.” (योिान ५:२२)

    प्रभ ूयेश ूिा खरोखर देवाचा पतु्र आिे िे त्याकाळच ेअनेक लोक मानायला तयार नव्िते. सतैानालािी ते पडताळून पािायच ेिोत.े म्ििून जेव्िा तो येशचूी परीक्षा घ्यायला आला तेव्िा त्याने आव्िान ददले की, तो देवाचा पतु्र असेल तर त्याने दिडाच्या भाकरी करून दाखवाव्यात ककंवा मोठ्या उंचीवरून उडी मारून दाखवावी. (मत्तय ४:३, ४:६)

    येश ूविस्तंभावर णखळलेला असताना जे लोक त्याच्या जवळून जात िोते ते बोलत िोत ेकी, तो जर देवाचा पतु्र असेल तर त्याला स्वतः खाली उतरता आले पादिजे. (मत्तय २७:३९)

  • देवपुत्राची १०० नावे - डॉ. रंजन केळकर 18

    येशचू्या मतृ्यनंूतर तथेे उपन्स्थत असलेला एक शतपती मात्र म्ििाला िोता की, “खरोखर िा देवाचा पतु्र िोता.” (मत्तय २७:५४)

    प्रभ ू येश ू देवाचा पतु्र आिे की नािी िे आपल्याला त्याची परीक्षा घेऊन ठरवता येण्यासारखे नािी, त ेआपि स्वतः अनभुव घेऊन पािायच ेआिे.

    ९. एकुलता एक

    समाजाची रचना काळाबरोबर बदलत जाते. िल्लीच्या समाजात कुटंुब लिान िोत चालल्याच ेआपि पाित आिोत. आता तर अनेक कुटंुबात आई-वडील आणि एक मलुिा ककंवा मलुिी एवढ्या तीनच व्यक्ती असतात. पवूीच्या काळी कुटंुबे खूप मोठी असायची. तीन-चार वपढ्यांच ेलोक एका छपराखाली सखुाने एकत्र नांदायच.े अशा कुटंुबप्रमखुांना घरात आणि समाजात मानाच ेस्थान लमळायच.े पि अपवाद म्ििून कािी आई-बापांना फक्त एकच मलुिा असायचा ककंवा एकच मलुिी असायची. त्या मलुांना एकुलता एक ककंवा एकुलती एक म्िटले जायच.े एकुलता एक मलुिा आई-बापाचंा लाडका असला तर त्यात काय नवल? त्यांची सवव िौस, माया, लक्ष, पे्रम, त्या एकुलत्या एकावर केन्न्द्रत िोत असे. त्याचं्या सवव संपत्तीचा तो वारीस असायचा. त्यांच्या घराण्याच ेनाव तो पढेु चालवायचा.

    प्रभ ूयेश ूएकदा एका निराच्या वेशीजवळ असताना लोक एका मेलेल्या मनषु्याला बािेर नते असल्याच ेत्याला ददसले. तो आपल्या आईचा एकुलता एक मलुिा िोता. त्याच्यावर अथावतच नतच ेन्जवापाड पे्रम असिार. नतच ेदःुख बघनू येशलूा कळवळा आला आणि त्याने नतला िीर ददला. तो जवळ िेला, त्यान ेनतरडीला िात लावला आणि त्या मलुाला जीवनदान ददले. (लकू ७:११-१४)

    दसुऱ्या एका वेळी प्रभ ूयेशचू्या भोवती असलेल्या िदीतून एक जि पढेु आला. त्याचा मलुिा भतूग्रस्त िोता. त्याने ओरडून येशलूा ववनविी केली की, “िुरू, माझ्या मलुाकड ेपिा; कारि तो माझा एकुलता एक आिे.” आपला लाडका मलुिा बरा व्िावा म्ििून तो कािीिी करायला तयार झाला असावा. येशनेू त्या अशदु्ि आत्म्याला दटावले आणि त्या मलुाला बरे केले. (लकू ९:३७-४३)

    पववत्र शास्त्र सािंत ेकी, देवाला एकच पतु्र आिे. तो त्याचा एकुलता एक आिे. तो त्याला वप्रय आिे. (मत्तय ३:१७) तो त्याच्या इतक्या जवळचा आिे की, येश ू

  • देवपुत्राची १०० नावे - डॉ. रंजन केळकर 19

    म्ििाला की, “मी आणि वपता एक आिोत.” (योिान १०:३०) “माझ्याद्वारे आल्यालशवाय कोिी वपत्याकड ेयेत नािी.” (योिान १४:६)

    पि देवाने काय केले? देवान े त्याचा एकुलता एक, परमवप्रय, अत्यंत जवळचा, त्याच ेप्रनतरूप असलेला, असा त्याचा पतु्र जिाला ददला ह्यासाठी की, जो कोिी त्याच्यावर ववश्वास ठेवतो त्याचा नाश िोऊ नये तर त्याला सनातन जीवन लमळाव.े (योिान ३:१६)

    १०. अलभवषक्त

    अलभवषक्त म्ििजे अलभषके केलेली व्यक्ती. अलभषकेाच्या प्राचीन संस्कारात तेल, तूप, दिू, असे एखादे द्रव्य शरीरावर, ववशषेतः मस्तकावर, लशपंडण्याची ककंवा ओतण्याची प्रथा िोती. कोिावर कािी मित्त्वाची कामधिरी सोपवताना, कोिी एखादे अधिकारपद ग्रिि करण्याआिी, ककंवा राजाच्या राज्यारोििाच्या समारंभात, त्याचा अशा प्रकारे अलभषके केला जात असे. याजक, संदेष्टे आणि राजांच्या अलभषकेांच ेअनेक उल्लेख जुन्या करारात आढळतात. (उदा. ननिवम २८:४१, १ राजे १९:१६, १ शमवेुल १०:१) प्रभ ू येशनेू जेव्िा त्याच े सेवाकायव सरुू केले तेव्िा तो त्याच्या िावी, म्ििजे नासरेथला, शब्बाथ ददवशी सभास्थानात िेला. तेथ े त्याने यशया संदेष्टयाच्या पसु्तकातून वाचले, ‘प्रभचूा आत्मा माझ्यावर आिे. कारि मी दीनांना सवुाताव सांिावी ह्याकरता त्याने मला अलभषके केला आिे. आणि ह्याकरता पाठववले आिे की, मी अटकेतल्यांना सटुका आणि अंिळ्यांना दृष्टी ववददत करावी; जे ठेचले जात आिेत त्यांना सोडवावे; प्रभचू ेअनकूुल वषव िाजवावे.’ मि सभास्थानातील लोकांना तो म्ििाला की, “आज तुमच्या श्रविात िा शास्त्रलेख पिूव झाला आिे”. (लकू ४:२१, यशया ६१:१)

    देवाच्या पतु्राचा याजक, संदेष्टा आणि राजा म्ििून अलभषके केलेला आिे. पि तो तेलासारख्या द्रव्यान ेनािी, तर देवाच्या आत्म्याने आणि सामथ्यावने केलेला आिे. येशचू्या बान्प्तस्म्याच ेपववत्र शास्त्रात असे विवन आिे की, तो जेव्िा यादेन नदीच्या पाण्यातून वर आला, तवे्िा आकाश उघडले आणि देवाचा आत्मा त्याच्यावर कबतुरासारखा उतरताना ददसला. त्याच वळेी आकाशातून एक वािी ऐकू आली,

  • देवपुत्राची १०० नावे - डॉ. रंजन केळकर 20

    ‘िा माझा वप्रय पतु्र आिे, ह्याच्याववषयी मी संतषु्ट आिे.’ (मत्तय ३:१६-१७, पे्र.कृ. १०:३८)

    दाववदाने देवाच्या अलभवषक्ताववषयी भववष्य वतववले िोत ेकी, “राष्रे का खवळली? आणि लोकांनी व्यथव िोष्टी का योजल्या? परमेश्वराववरुद्ि, आणि त्याच्या अलभवषक्ताववरुद्ि, पथृ्वीच ेराजे उभे रादिले, आणि अधिकारी एकत्र जमले.” (स्तोत्र २:१-२) िी भववष्यवािी खरी ठरली कारि शवेटी येशचू्याववरुद्ि यरुशलेम निरात, िेरोद आणि पंतय वपलात िे परजनांबरोबर आणि इस्राएलाच्या प्रजेबरोबर एकत्र जमले आणि त्याला विस्तंभावर णखळण्यात आले. (पे्र.कृ. ४:२५-२७)

    ११. मलशिा

    मळू ग्रीक नव्या करारात जेथे जेथे “christos” िा शब्द आिे तेथे तेथ ेमराठीत त्याचा अनवुाद णिस्त असा केला िेला आिे. ग्रीक “christos” ह्या शब्दाचा अथव अलभवषक्त ककंवा मलशिा असा आिे. पि मलशिा म्ििजेच णिस्त असल्याच ेस्पष्टीकरि संत योिानाने त्याच्या शभुवतवमानात दोनदा केलेले आिे. लशमोन पेत्राने जेव्िा येशलूा प्रथम पादिले, तवे्िा यिुदी लोक ज्याची िजारो वष ेवाट बघत िोत ेतोच िा मलशिा आिे अशी त्याला खातरी वाटली. तो लिेच आपला भाऊ अंदद्रया ह्याला म्ििाला की, “आम्िाला मलशिा (म्ििजे णिस्त) सापडला आिे.” (योिान १:४०-४१)

    सखुार नावाच्या िावी येश ूएका ववदिरीजवळ बसला असताना तथेे एक शोमरोनी बाई आली िोती. त्यांच्यात झालेले संभाषि योिानाने ललदिले आिे. ती बाई येशलूा म्ििाली िोती, “मी जाित ेकी, मलशिा (म्ििजे णिस्त) येिार आिे; तो येईल तेव्िा तो सवव िोष्टी आम्िाला सािेंल.” त्यावर येश ू नतला म्ििाला िोता की, “तुझ्याशी बोलिारा मी तो आिे.” (योिान ४:४-२६)

    यिुदी लोकांच्या मनात मलशिाववषयी अशी कल्पना िोती की, तो एका सामथ्यवशाली राजासारखा येईल, एक प्रबळ राज्य प्रस्थावपत करील, त्यांना सवव जाचापासनू सोडवील आणि त्यांच्यावरचा सिळा अन्याय दरू करील. पि तसे झाले नािी. प्रभ ूयेशचू े राज्य ह्या जिातील नव्ितेच. तो स्विावच्या राज्याची स्थापना करायला पथृ्वीवर आला िोता. मािसांना त्यांच्या पापांपासनू मकु्ती द्यायला तो आला

  • देवपुत्राची १०० नावे - डॉ. रंजन केळकर 21

    िोता. त्याने देवाच्या प्रीतीचा, पापांच्या क्षमेचा आणि साववकाललक जीवनाचा संदेश ददला.

    पषु्कळ यिुदी लोकांना येशचूी खरी ओळख पटलीच नािी. जो योिान येशचू्या येण्याववषयी घोषिा करत कफरत असे तोच स्वतः साशंक िोता की, येश ूिा खरा मलशिा आिे की नािी. योिान तुरंुिात असताना त्याने येशचू्या कामाववषयी ऐकले, तेव्िा त्यान ेआपल ेदोन लशष्य त्याच्याकड ेपाठवले. त्यांनी येशलूा सरळ प्रश्न ववचारला की, “आपि जो येिार आिे तो आिात की, आम्िी दसुऱ् याची वाट पिावी?”

    येशनेू त्यांना उत्तर देऊन म्िटले, “जा, आणि तुम्िी ज्या िोष्टी ऐकत आिा आणि पिात आिा त्या योिानाला सािंा, अंिळे पाितात आणि पांिळे चालतात, मेलेले उठवले जातात आणि दीनांना सवुाताव सांिण्यात येते. आणि ज्या कोिाला माझ्यात अडथळा िोिार नािी तो िन्य.” (मत्तय ११:२-६) यशया संदेष्टयाची भववष्यवािी प्रभ ूयेशमूध्ये पिूव झाली ह्यातच तो मलशिा असल्याचा परुावा आिे. (यशया ३५:४-६)

    १२. मनषु्याचा पतु्र

    प्रभ ूयेश ूअनेकदा दसुऱ्या लोकांशी बोलताना स्वतःला मनषु्याचा पतु्र म्िित असे. देवाच्या पतु्राच ेपथृ्वीवर येण्याच ेकारि त्याने साधंितले की, “मनषु्याचा पतु्र सेवा करून घ्यायला नािी, पि सेवा करायला, आणि पषु्कळांसाठी खंडिी म्ििून आपला जीव द्यायला आला.” (मत्तय २०:२८, माकव १०:४५) तसेच “मनषु्याचा पतु्र िरवलेल्यास शोिायला आणि तारायला आला.” (लकू १९:१०)

    प्रभ ूयेशनेू ककतीतरी लोकांना त्यांच्या व्यािींपासनू मकु्त केल्याची उदािरिे आिेत. पि कािींना तो म्िित असे की, “तुझ्या पापांची क्षमा केली आिे.” (मत्तय ९:२, लकू ७:४८) देवाखेरीज अन्य कोिी पापांची क्षमा करू शकतो िे यिुदी लोकांना पटण्यासारखे नव्िते. लशवाय किीकिी शब्बाथ ददवशीिी येश ूलोकांना बरे करत असे. शब्बाथ ददवस िा पववत्र आणि ववसाव्याचा ददवस म्ििून पाळिाऱ्या यिुदी लोकांना िेिी मान्य नव्िते. पि येशवूर आके्षप घेिाऱ्यांना त्याच ेस्पष्ट उत्तर िोत ेकी, “मनषु्याच्या पतु्राला, पथृ्वीवर, पापांची क्षमा करायचा अधिकार आिे.” (मत्तय

  • देवपुत्राची १०० नावे - डॉ. रंजन केळकर 22

    ९:६, माकव २:१०, लकू ५:२४) आणि “मनषु्याचा पतु्र शब्बाथाचा िनी आिे.” (मत्तय १२:८, लकू ६:५)

    येशचू्या अवतीभवती नेिमीच खपू लोक असायच ेआणि तो जेथे जाई तेथे लोकांच ेमोठे घोळके त्याच्या मािोमाि पायी चालत जायच.े एकदा त्याच्या तोंडून उद्िार ननघाले की, “खोकडानंा त्रबळे, आणि आकाशातल्या पक्षयांना घरटी आिेत, पि मनषु्याच्या पतु्राला डोके टेकायला कुठेच कािी नािी.” (मत्तय ८:२०, लकू ९:५८)

    पि देवाच्या पतु्राची पथृ्वीवर िी अवस्था झाली असली तरी तो पथृ्वीवर पनु्िा एकदा मोठ्या िौरवान ेपरतिार आिे िे त्याने ननन्श्चतपिे साधंितले आिे. “आणि मि आकाशात मनषु्याच्या पतु्राच ेधचन्ि प्रिट िोईल, आणि पथृ्वीवरील सवव वंश आपले ऊर बडवतील. आणि मि त े मनषु्याच्या पतु्राला आकाशातल्या ढिातं पराक्रमान ेआणि मोठ्या िौरवान ेयेताना पाितील.” (मत्तय २४:३०, माकव १३:४६, लकू २१:२७) तो असेिी म्ििाला की, “तमु्िी तयार व्िा. कारि तुम्िाला वाटत नािी अशा घटकेस मनषु्याचा पतु्र येईल.” (मत्तय २४:४४, लकू १२:४०)

    मनषु्याचा पतु्र म्ििजेच देवाचा पतु्र ह्यात कािीिी संदेि नािी.

  • देवपुत्राची १०० नावे - डॉ. रंजन केळकर 23

    घराण्याशी संबंधित नावे

    13. मररयेचा पतु्र 14. योसेफाचा पतु्र 15. दाववदाचा पतु्र 16. दाववदाचा अंकुर 17. इशायाचा अंकुर 18. कोंब 19. लसिं

  • देवपुत्राची १०० नावे - डॉ. रंजन केळकर 24

    १३. मररयेचा पतु्र

    प्रभ ूयेशचू ेबाळपि आणि तरुिपि कसे िेले ह्याववषयी पववत्र शास्त्रात फारसे ललदिलेले नािी. असे म्िटले आिे की, तो मोठा िोत असताना ज्ञानीपिाने भरला आणि देवाच्या व मनषु्यांच्या कृपेत तो वाढत िेला. एकीकड ेदेवाचा पतु्र म्ििून देववपत्याशी त्याच े ववशषे नाते िोत,े आणि तो मंददराला त्याच्या वपत्याच े घर मानत असे. पि त्याबरोबर नासरेथला त्याच्या आईवडडलांच्या घरी राित असताना त्यांनािी तो आज्ञांककत रादिला िोता. (लकू २:४०-५२) येशचू्या िावच ेलोक त्याला मररयेचा पतु्र म्ििून ओळखायच ेआणि त्याच्या इतर कुटंुत्रबयांची मादितीिी लोकांना िोती. (माकव ६:३)

    येशलूा एकदा एक मािूस भेटायला आला असता त्याने त्याला आठवि करून ददली िोती की, “त ूआपल्या बापाला आणि आईला मान दे” िी देवाची आज्ञा त्याने पाळली पादिजे. (माकव १०:१९) पि दसुऱ्या एका प्रसंिी, येश ूसभास्थानात लोकांशी बोलत असताना त्याला ननरोप लमळाला की, त्याची आई आणि त्याच ेभाऊ बािेर उभे असनू त्यांना त्याच्याशी बोलायच ेआिे. तवे्िा येशचूी प्रनतकक्रया अिदी ननराळी िोती. त्याने ववचारले, “माझी आई कोि आिे? आणि माझ ेभाऊ कोि आिेत? जो कोिी माझ्या स्विावतील वपत्याच्या इच्छेप्रमािे करील तोच माझा भाऊ, माझी बिीि आणि माझी आई.” (मत्तय १२:४६-५०)

    प्रभ ूयेशनेू असेिी म्िटले िोत ेकी, “जो माझ्यापेक्षा बापावर ककंवा आईवर अधिक प्रीती करील तो मला योग्य नािी. जो माझ्यापेक्षा मलुावर ककंवा मलुीवर अधिक प्रीती करील तो मला योग्य नािी. आणि जो आपला विस्तंभ घेऊन माझ्यामािे येत नािी तो मला योग्य नािी.” (मत्तय १०:३७-३८)

    येशचू्या ह्या वविानाचा असा अथव लावायचा नािी की, त्याचा लशष्य िोण्यासाठी आपि सवव नातेसंबंि तोडून टाकायच े ककंवा आपल्या आई-वडडलांची काळजी करायच ेआपि सोडून द्यायच.े आपि काय करायला पादिजे ते येशनेू त्याच्या पथृ्वीवरील जीवनाच्या अंनतम क्षिांत स्वतः दाखवनू ददले.

    येशलूा विस्तंभावर णखळले िेले त्या जािी त्याची आई मररया उभी िोती, आणि नतच्याबरोबर कािी इतर न्स्त्रयािी िोत्या. विस्तंभावरील यातना सिन करत असतानादेखील आपल्या मतृ्यनंूतर आपल्या आईच ेकाय िोईल िा ववचार येशचू्या

  • देवपुत्राची १०० नावे - डॉ. रंजन केळकर 25

    मनात आला असावा. नतची काळजी घेण्याची जबाबदारी त्यान ेत्याचा लशष्य योिान ह्याच्यावर सोपवली. तो मररयेला म्ििाला, “बाई, बघ, तुझा पतु्र!” आणि योिानाला म्ििाला, “बघ, तुझी आई!” आणि योिानाने ती जबाबदारी लिेच स्वीकारली. (योिान १९:२५-२७)

    येशचू्या जन्मापवूी मररया म्ििाली िोती की, “पिा, आतापासनू सवव वपढ्या मला िन्य म्िितील,” ते उिीच नािी. (लकू २:४८)

    १४. योसेफाचा पतु्र

    संत मत्तयाने त्याच्या शभुवतवमानाची सरुुवात “अब्रािामाचा पतु्र, दाववदाचा पतु्र येश ूणिस्त” ह्याच्या वशंावळीन े कलेली आिे, कारि त्याचा जन्म दाववदाच्या राजघराण्यात झाला िोता ह्यावर मत्तयाला ववशषे भर द्यायचा िोता. (मत्तय १:१) वंशावळीच्या शवेटी योसेफाच े नाव आिे, ज्याच्याववषयी ललदिले आिे की, “न्जच्यापासनू णिस्त म्िटलेला येश ूजन्मला त्या मररयेचा िा पती.” (मत्तय १:१६)

    योसेफ िा नीनतमान मनषु्य िोता. (मत्तय १:१९) परमेश्वराचा दतू योसेफाला तीनदा स्वप्नात प्रकट झाला िोता आणि त्यान ेत्याच ेमािवदशवन केले िोते. (मत्तय १:२०, २:१३, २:१९) योसेफ िा येशचूा शारीररक दृष्टीने बाप नसला तरी, नासरेथ िावातले रदिवासी येशलूा योसेफाचा पतु्र असे समजत. (लकू ३:२३)

    योसेफ येशचू्या बाबतीत िालमवक ननयमाचं े आणि रूढींच े पालन करत असे. व्यवसायाने तो एक सतुार असल्यामळेु येशलूा सतुाराचा मलुिा म्ििूनिी लोक ओळखत असत. योसेफाने येशलूा सतुारकाम लशकवलेिी असेल. एका सामान्य कुटंुबातील मलुिा म्ििून त्याच्याकडून लोकांच्या फार मोठ्या अपेक्षा नसल्या तर त्यात नवल नािी.. म्ििून येश ूजेव्िा तीस वषाांचा झाल्यावर सभास्थानात लशक्षि देऊ लािला आणि चमत्कार करू लािला तेव्िा ते आश्चयवचककत झाले. (मत्तय १३:५४-५६, लकू ४:१४-२२, योिान ६:४२)

    योसेफाच्या जीवनाववषयी फारच थोडी मादिती पववत्र शास्त्रात सापडत.े येशलूा विस्तंभावर णखळले त्यावेळी मररया तेथे िोती पि योसफे तेथे असल्याचा कािी उलेल्ख नािी. त्याचा मतृ्य ूआिीच झाला असल्याची शक्यता नाकारता येत नािी. पि त ेमित्त्वाच ेनािी. मित्त्वाच ेिे आिे की, येश ूयोसेफाचा पतु्र िोता आणि योसेफ दाववदाचा वंशज म्ििजे दाववदाचा पतु्र िोता, म्ििून देवाच्या योजनेप्रमािे देवपतु्र

  • देवपुत्राची १०० नावे - डॉ. रंजन केळकर 26

    दाववदाच्या घराण्यात जन्माला आला आणि त्याच्या बाबतीत जे जे भववष्य संदेष्टयांनी वतववले िोते त ेसवव पिूव झाले.

    १५. दाववदाचा पतु्र

    नव्या कराराच्या सरुुवातीस, संत मत्तयाच्या शभुवतवमानाच्या अिदी पदिल्याच वचनात, “दाववदाचा पतु्र येश ूणिस्त” िे शब्द आढळतात. देवाच्या पतु्राची ओळख दाववदाचा पतु्र म्ििून करून ददली िेली आिे. दावीद िा इस्राएलाचा एक मिान राजा िोऊन िेला आणि त्याच्या राजघराण्यात देवाचा पतु्र मनषु्यरूपाने जन्माला झाला, िे मत्तयाला त्याच्या वाचकांना आवजूवन सांिायच ेिोत.े

    दावीद िा एक मिान राजा असला, पववत्र शास्त्रातील त्याची सुंदर स्तोत्र ेअजूनिी वाचली जात असली, तरीिी तो कोिी सािसंुत िोता असे नािी. त्याच्या पापांची त्याला जािीव व्िावी म्ििून देवाला त्याच्याकड ेएक संदेष्टा पाठवायला लािला िोता. त्यानंतर त्याला पश्चात्ताप झाला आणि त्यान ेपरमेश्वराची प्राथवना केली की, “िे देवा, त ूआपल्या वात्सल्याला अनसुरून माझ्यावर कृपा कर; त ूआपल्या ववपलु करुिेला अनसुरून माझ ेअपराि काढून टाक. मला िऊुन माझा दोष पिूवपिे काढून टाक, माझ ेपाप दरू करून मला ननमवळ कर. कारि मी आपले अपराि जािून आिे, माझ ेपाप माझ्यापढेु ननत्य आिे.” (स्तोत्र ५१:१-३)

    यिुदी लोकांची िी आशा आणि अपेक्षा िोती की, त्यांचा मलशिा दाववदाच्या घराण्यात जन्म घेईल. येश ू िाच तो मलशिा आिे की नािी िा एक चचचेा ववषय िोता. (मत्तय १२:२३, २२:४२, माकव १२:३५, लकू २०:४१) कािींना शंका िोती, तर कािींची खात्री िोती. शवेटी तर लोकांनी मोठ्या संख्येत रस्त्यावर येऊन दाववदाच्या पतु्राचा जयजयकारिी केला िोता. जि ूसबंि यरुशलेम शिर त्या उत्सािात सिभािी झाले िोत.े (मत्तय २१:९-१५)

    पि मखु्य म्ििजे येश ू िा दाववदाचा पतु्र आिे ह्या ववश्वासाने त्याला “िे दावीदपतु्रा!” म्ििून मोठ्याने िाक मारिारे, दरुून त्याच ेलक्ष वेििारे, असे दीन-दबुळे, त्रासलेले, अंिळे, पांिळे लोकिी िोते. येशनेू त्यांना किी ननराश केले नािी. त्याने त्यांना त्यांच्या व्यािींपासनू मकु्त केले, कारि तो देवाचा पतु्र िोता. (मत्तय ९:२७, १५:२२, २०:३०-३१, माकव १०:४७-४८, लकू १८:३८-३९)

  • देवपुत्राची १०० नावे - डॉ. रंजन केळकर 27

    १६. दाववदाचा अंकुर

    देवाच्या पतु्राने स्वतःववषयी म्िटले आिे की, “मी दाववदाचा अंकुर आणि वंश आिे. मी पिाटेचा प्रकाशमान तारा आिे.” (प्रकटी २२:१६)

    संत पौलाने ह्याची पाश्ववभमूी अशी समजावनू साधंितली आिे की, “इस्राएली लोकांनी राजा माधितला, आणि देवान ेत्यानंा ककशाचा पतु्र शौल िा बन्यालमनाच्या वंशातला मनषु्य चाळीस वषाांपयांत ददला. आणि त्याने त्याला दरू केले तेव्िा त्यांचा राजा व्िायला दावीद उभा केला, आणि त्याने त्याच्याववषयी साक्ष देऊन म्िटले, ‘इशायाचा पतु्र दावीद िा मला माझ्या मनासारखा मनषु्य लमळाला आिे; तो माझी सवव इच्छा पिूव करील.’ आणि देवाने वचनानसुार, ह्या मनषु्याच्या संतानातून, इस्राएलासाठी येश ूिा तारिारा उभा केला.” (पे्र.कृ. १३:२१-२३)

    आता िा प्रश्न उद्भवतो की, येश ूदाववदाचा पवूवज आणि वंशज दोन्िी कसा अस ूशकतो. एकदा परोशी एकत्र जमले असताना स्वतः येशनेूच त्यांच्यापढेु िा ववरोिाभास ठेवला आणि ववचारल ेकी, “तमु्िाला णिस्ताववषयी काय वाटते? तो कोिाचा प�